पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज एहमद शहजाद डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळ्याचे नुकतेच समोर आले आहे.
पाकिस्तान कप या देशांतर्गत स्पर्धेवेळी घेण्यात आलेल्या डोपिंग टेस्टचा अहवाल नुकताच समोर आला. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने एक ट्वीट करून ही माहीती दिली आहे. पण त्यामध्ये त्यांनी खेळाडूचे नाव उघड केले नाही.
“एका खेळाडूने बंदी असलेले द्रव्य सेवन केल्याचे समोर आले आहे. आयसीसीच्या नियमाप्रमाणे या अहवालावर पाकिस्तान सरकारच्या अॅन्टी डोपिंग एजन्सीकडून शिक्केमोर्तब होत नाही तोपर्यंत त्या खेळाडूचे नाव जाहीर करता येणार नाही.” असे पीसीबीने ट्वीट केले आहे.
A player has reportedly tested positive for a prohibited substance. But under ICC rules PCB cannot name the player or chargesheet him until the chemical report is CONFIRMED by the Anti-Dope Agency of the government. We should have an answer in a day or two.
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 20, 2018
डोपिंग टेस्टमध्ये दोषी अढळलेला हा खेळाडू एहमद शेहजाद असल्याची माहिती झीनाम अब्बास या पाकिस्तानी पत्रकाराने ट्वीट करून दिली आहे.
“स्काॅटलंड मालिकेपूर्वी पाकिस्तान कप स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या डोपिंग टेस्टमध्ये मारिजुआना हे द्रव्य सेवन केल्याप्रकरणी एहमद शेहजाद दोषी आढळला आहे.” असे झीनाम अब्बास यांनी ट्वीट केले आहे.
Ahmad Shahzad has been tested positive for Marijuana – the test was conducted prior to the Scotland series during Pakistan Cup.
— zainab abbas (@ZAbbasOfficial) June 20, 2018
एहमदने पाकिस्तानकडून खेळलेल्या 81 एकदिवसीय सामन्यात 2506 धावा केल्या आहेत. तर 57 टी-20 सामन्यात 1454 धावा केल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान संघाचा भाग असलेल्या एहमदला पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही.
तसेच मर्यांदित षटकांच्या सामन्यातही त्याची गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी झालेली नाही.
एहमद शेहजादच्या अहवालावर येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–अवघ्या 24 तासात इंग्लंड क्रिकेट संघाचा आणखी एक विश्वविक्रम
–चक्क वनडेत फाॅलो-आॅन??? आॅस्ट्रेलियन संघाची सोशल मीडियावर चेष्टा!






