पाकिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू आसिफ अली सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आसिफने पाकिस्तान संघासाठी टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याने त्याच्या विश्वचषकातील प्रदर्शनाच्या जोराबर फक्त पाकिस्तानच नाही, तर जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रदर्शनामुळे आसिफ स्वत: देखील आनंदी असणार आहे. असे असले तरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती, ज्याला तो कधीच विसरू शकणार नाही.
साल २०१९ हे आसिफ अलीसाठी खूपच वाईट ठरले होते. त्याने यावर्षी त्याच्या प्रिय मुलीला कायमचे गमावले होते. आसिफची २ वर्षाची लहान मुलगी नूर फातिमाचे यावर्षी निधन झाले होते. नूर कॅंसर या गंभीर आजाराने ग्रस्त होती. या आजारावर उपचार घेत असताना तिचे निधन झाले होते. आसिफ त्यावेळी पाकिस्तान संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच आसिफने दौरा आर्ध्यात सोडला आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला होता.
यावेळी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी आसिफ अलीने त्याच्या मुलीसाठी प्रार्थना करण्याची चाहत्यांकडे विनंती केली होती. आसिफने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट शेअर करत ही विनंती केली होती. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते की, “माझी मुलगी चौथ्या स्टेजच्या कँसरशी झुंज देत आहे. आम्ही तिला उपचारासाठी यूकेमधील दवाखान्यात भरती केले आहे. माझ्या मुलीसीठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा.”
मात्र, त्याच्या मुलीचा या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी देखील त्याने भावनिक ट्विट केले होते.
Today is your second birthday, Dua fatima. You left us too early but you will always be in my heart. we miss you very much every day.
Happy birthday my angel. You are in a better place.
Pls pray for jannat for my lovely baby dua. #Daughter pic.twitter.com/qinD8uQ2i9
— Asif Ali (@AasifAli45) September 20, 2019
दरम्यान, विश्वचषकात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात आसिफ अलीने दिलेल्या महत्वाच्या योगदानाच्या जोरावर पाकिस्ताने सहा चेंडू राखून आणि पाच विकेट्सच्या नुकसानावर सामन्यात विजय मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत २४ धावांची आवश्यकता होती. मात्र, आसिफ अलीने १९ व्या षटकातच सामना जिंकवून दिला. त्याने या षटकात चार षटकार ठोकले. त्याने सामन्यात अवघ्या सात चेंडूंचा सामना केला आणि २५ धावा करून नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
महिंद्रांनी पाळला शब्द! ‘गोल्डन बॉय’ नीरजला भेट दिली ‘स्पेशल XUV700’
कुछ हटके! भारतीय संघाचा अनोख्या पद्धतीने झेल घेण्याच सराव; आयसीसीकडून व्हिडिओ शेअर
विराटने ती गोष्ट करावी, जी धोनी नेतृत्व करताना करायचा, हरजभजन सिंगचा सल्ला






