पाकिस्तान क्रिकेटपटू उमर अकमलवर घराबाहेर जीवघेणा हल्ला झाला आहे. या संदर्भात उमरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक ब्रिटनमधील व्यक्ती असल्याचे उघडकीस आले आहे. खरतर उमर यापूर्वी देखील वादात होता. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रकरण लपविल्याचा आरोप होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर 18 महिन्यांसाठी बंदी देखील घातली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, उमर अकमलवर हल्ला करणारे दोघेजण त्याचे चाहते बनून घरात घुसले होते. त्यामुळे अकमल त्यांच्याबरोबर सेल्फी घेत होता. यादरम्यान त्यांच्यामध्ये कसला तरी वाद झाला आणि हा प्रकार घडला. अकमल याने पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओद्वारे पुरावा देखील दिला आहे. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन संशयितांना अटक देखील केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये दोघांपैकी एक ब्रिटनचा आणि दुसरा पाकिस्तानचा व्यक्ती आहे. उमरच्या कराचीमधील राहत्या घराबाहेर हा हल्ला झाला आहे.
बोर्डाने 18 महिन्यांनी बंदी घातली
काही लोकांच्या मते उमर अकमलसोबत सेल्फी घेताना काही जणांवर त्याने मारहाण केल्याचा आरोप केला. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमलचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये अकमलने त्याच्या कृत्याबद्दल क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली होती. सामना फिक्सिंगमुळे त्याच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. पीसीबीने पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) 5 व्या हंगामाच्या अगोदर संशयास्पद आढळल्यानंतर उमर अकमलला निलंबित केले होते.
उमर अकमल अनुशासित क्रिकेटपटू राहिल
पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्यातच शतक झळकावणारा हा क्रिकेटपटू अतिशय शिस्तबद्ध क्रिकेटपटू आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी त्याला मानसिक आजाराच्या डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्लाही दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
फर्स्ट क्लास! ब्रावोने एका हाताने ठोकला कडक सिक्स, गोलंदाजाने नवलाने तोंडात घातली बोटे
रसेलच्या तूफान फटकेबाजीने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा उडाला थरकाप, टी२०त पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
अवघा ३३ चेंडूंमध्ये ७ गडी बाद करत सर्वांनाच केले होते चकित, आता बोर्डाने थांबवली पगार