टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसच शिल्लक आहेत. ही स्पर्धा तब्बल ६ वर्षांनंतर खेळविण्यात येणार आहे. शेवटची स्पर्धा २०१६ साली खेळविण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे.
नुकतेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या स्पर्धेचे गट आणि वेळापत्रक देखील जाहीर केले होते. त्यानंतर क्रिकेट जगतात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडू या स्पर्धेला धरून आपापले तर्क-वितर्क मांडत आहे.
यातच आता पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वाहाब रियाजने देखील आपले तर्क मांडले आहे. त्याच्यामते येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत आहे. जो कोणत्याही संघाला हरवू शकतो. तसेच पाकिस्तानचा संघ सामन्यांचा निकाल आपल्या बाजूनेही वळवू शकतो. टी-२० या प्रकारात कोणताही संघ कधीही बाजी मारू शकतो.
क्रिकेट हा मुळातच अनिश्चिततेचा खेळ आहे. हा नियम टी-२० च्या प्रकारात तंतोतंत लागू होतो. याबाबत पाकिस्तानच्या एका वेबसाईट सोबत बोलताना रियाज म्हणाला, “आमच्या संघाकडे सामन्याच्या निर्णयाला बदलण्याची क्षमता आहे. जर आम्ही आमच्या पूर्णक्षमतेने खेळलो, तर आम्ही भारतासहित जगातील कोणत्याही संघाला या स्पर्धेत हरवू शकतो. टी-२० स्पर्धेचे स्वरूप असे आहे, ज्यामध्ये काही चेंडू देखील संपूर्ण सामना बदलू शकतो. तर एखादी घटना पूर्ण सामन्याच्या निर्णयाला देखील बदलू शकते.”
“त्यामुळे येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात असे होऊ शकते. जर आम्ही उत्कृष्ट प्रदर्शन केले तर आम्ही नक्कीच भारताला परास्त करू शकतो,” असेही रियाज म्हणाला.
या कारणामुळे पाकिस्तान संघाला होऊ शकतो टी-२० विश्वचषक स्पर्धेत फायदा
यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा आता यूएईला आयोजित करण्याचे ठरवले. यावर रियाजच्या मते यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे पाकिस्तानला भरपूर फायदा होऊ शकतो. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानचा संघ यूएईच्या मैदानावर खेळलेला आहे. अशात पाकिस्तानच्या खेळाडूंना तिथल्या खेळपट्टीचा आणि वातावरणाचा पूर्ण अनुभव आहे. याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.
याबाबत रियाज म्हणाला, “आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे, याचा पाकिस्तानला नक्कीच फायदा होणार आहे. कारण पाकिस्तानने यूएईमध्ये खूप क्रिकेट खेळलेले आहे. अशा वेळी टी-२० सारख्या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये होणार असल्याने, आमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. अशावेळी जर पाकिस्तानच्या संघाला तिथल्या परिस्थितीचा आणि अनुभवाचा फायदा घेता आला, तर निश्चितच पाकिस्तानचा संघ किताब आपल्या नावे करू शकतो. मात्र, तरीही मला हे समजत नाही की पाकिस्तानचा संघ ही स्पर्धा जिंकणाऱ्याच्या दावेदारीत स्थान का बनवू शकला नाही.”
दरम्यान, नुकतेच आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले होते. ज्यामध्ये पात्रता फेरीचे सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर सुपर १२ चे सामने २३ ऑक्टोबर पासून खेळवले जाणार आहे. यामध्ये आयसीसीने दोन गट केलेले आहेत.
ज्यातील अ गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज आणि इंग्लंड संघ आहेत. तर दोन संघ पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत. तसेच ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्थानसह पात्रता फेरीतून दोन संघांचा समावेश होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबतच २४ ऑक्टोबरला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–भाविना पटेलने गाठली टोकियो पॅरालंपिक स्पर्धेची अंतिम फेरी, सुवर्णपदक पटकावण्यापासून एक पाऊल दूर
–Video: रसलची तुफानी फलंदाजी! सहा गगनचुंबी षटकारांसह झळकावले सीपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक
–धावांचा रतीब घालणारा रूट फलंदाजी करताना कधीच घालत नाही टोपी, ‘हे’ आहे कारण





