भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा दुखापतीमुळे होऊ घातलेल्या टी20 विश्वचषकात खेळू शकणार नाही. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्याचवेळी पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांनी बुमराहच्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय गोलंदाजीविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
सुमारास विश्वचषकातून बाहेर गेल्यानंतर भारतीय गोलंदाजी काहीशी कमजोर झाल्याचे अनेक दिग्गज म्हणताना दिसतायेत. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांनीदेखील असेच वक्तव्य केले. एका युट्युब चॅनलवर बोलताना जावेद म्हणाले,
“भारताचा फॉर्म सध्या तितका चांगला नाही. फलंदाजीत नक्कीच समस्या आहेत. जसप्रीत बुमराह बाहेर होणे हा संघासाठी सर्वात मोठा धक्का वाटतो. त्याच्याविना इतर सर्व गोलंदाज मध्यमगती गोलंदाज आहेत. तुम्हाला संघात एका अशा गोलंदाजाची गरज आहे, ज्यामुळे विरोधी संघाला दडपण यायला हवे. तो दोन संघातील अंतर होऊ शकतो.”
बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल व अर्शदीप सिंग हे प्रमुख वेगवान गोलंदाज भारतीय संघाचा भाग आहेत. तर मध्यमगती गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या गोलंदाजी विभागाला मदत करेल.
जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. तसेच त्याला आशिया चषक 2022 स्पर्धेसही दुखापतीमुळे मुकावे लागले होते. त्याने दुखापतीनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळले. मात्र, त्याला परत दुखापत झाली आणि तो महत्वाच्या स्पर्धेस मुकला. त्याच्या जागी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा समावेश केला गेला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप
हे काय होतं! जेमिमाचे सेलिब्रेशन पाहून तुम्हीही असंच म्हणाल; भन्नाट व्हिडिओ व्हायरल