---Advertisement---

मोठी बातमी! पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या मोहम्मद आमिरने तडकाफडकी घेतली निवृत्ती?

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 4:02 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहमद आमिरने कसोटी क्रिकेटला अगोदरच राम- राम ठोकला आहे. परंतु आता अशी माहिती मिळत आहे की, त्याने मर्यादित षटकांच्या खेळातून सुद्धा निवृत्ती घेतली आहे. आमिर 2009 साली पाकिस्तान संघाचा भाग होता आणि त्याने दमदार कामगिरी केली होती. 2010 साली स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकल्यानंतर त्याच्यावर पाच वर्ष बंदी घालण्यात आली होती. त्याच्यानंतर आमिरने पुनरागमन करताना पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

आमिरने कसोटी क्रिकेट मधून 2019 साली निवृत्ती जाहीर केली होती. पाकिस्तानच्या माध्यमांनुसार आमिरने आता वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे मन बनवले आहे.

आमिरने जगभर खेळल्या जाणार्‍या टी20 स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्यावर भरपूर प्रमाणात टीका झाली होती आणि पाकिस्तान संघाकडून मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळत नाही. असे म्हटले जात आहे की, यामुळे आमिरने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या एका पत्रकाराशी बोलताना आमिरने म्हटले की, “मी क्रिकेटपासून दूर जात नाही. मला नाही वाटत की मी या व्यवस्थापनाखाली क्रिकेट खेळू शकेल. मला वाटते की, सध्या क्रिकेट सोडले पाहिजे. मला मानसिकरीत्या त्रास दिला जात आहे.”

पत्रकाराने ट्वीट करत म्हटले की, “पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने पाकिस्तान संघ व्यवस्थापनाच्या वागणूकीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे मला सांगितले आहे.”

मोहम्मद आमिरची कामगिरी
मोहमद आमिरने पाकिस्तान संघासाठी 36 कसोटी, 61 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 259 बळी आपल्या नावावर केले आहेत. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे आमिर खूप प्रसिद्ध राहिला आहे आणि मोठ मोठ्या फलंदाजांना आपल्या समोर गुडघे टेकायला भाग पाडले आहे.

वनडेत त्याने एका सामन्यात 30 धावा देवून 5 विकेट घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कसोटीत त्याने एका डावात 44 धावा देताना 6 विकेट्स घेतल्या आहेत. तिन्ही प्रकारात त्याची इकॉनॉमी चांगली राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND Test Live : कोहलीचे अर्धशतक, कांगारूंकडून टिच्चून गोलंदाजी; ६१ षटकात भारत ३ बाद १२८ धावांवर

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास! ‘या’ फलंदाजाने ८७ वर्षांपूर्वी झळकावले होते पहिले शतक

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---