ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी (१२ जून) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यासाठी २९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. परंतु, पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि मधल्या फळीतील फलंदाज हॅरिस सोहेल यांनी वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे पीसीबीने संघात ३६ वर्षीय सोहेल खान आणि १९ वर्षीय हैदर अलीची निवड केली आहे. २००९मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या सोहेलने त्या मालिकेत केवळ १ सामना खेळला. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याला २०११मध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी देण्यात आली. पण, संपूर्ण वर्षात तो फक्त एकच सामना खेळू शकला.
पुढे पाकिस्तानच्या कसोटी संघात स्थान मिळण्यासाठी त्याला २०१६पर्यंत वाट पाहावी लागली. परंतु, २ वेळा कसोटी संघातून बाहेर पडलेल्या सोहेलने यावेळी दमदार पुनरागमन केले. त्याने संपूर्ण वर्षात ७ सामने खेळत २६ विकेट्स घेतल्या. यात त्याच्या इंग्लंडविरुद्ध घेतलेल्या ५/६८ या सर्वोत्तम कामगिरीचाही समावेश होता.
सोहेलने २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यात २ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. अशाप्रकारे त्याने २ सामन्यात एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या. एवढ्या शानदार प्रदर्शनानंतरही सोहेलला पाकिस्तानच्या कसोटी संघातून बाहेर करण्यात आले. डिसेंबर २०१६मध्ये सोहेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
सोहेल २०१९मध्ये कायदे-आझम ट्रॉफीच्या सिंध संघाचा भाग होता. यावेळी त्याने संपूर्ण हंगामात ९ सामने खेळत २२ विकेट्स घेतल्या होत्या. कदाचित त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे सोहेलला कसोटी संघात स्थान देण्यात आले असावे. अशाप्रकारे इंग्लंड दौऱ्यावर वयाच्या ३६व्या वर्षी सोहेल चौथ्यांदा पाकिस्तान कसोटी संघात पुनरागमन करणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला पाकिस्तानचा २९ सदस्यीय संघ-
ट्रेंडिंग घडामोडी-
अजिंक्य रहाणेकडून वाढदिवसाच्या दिवशीच आदित्य ठाकरेंचं जोरदार कौतूक
संजू सॅमसन म्हणतोय, धोनीचा फक्त तो एक गुण माझ्यात आला की बस्सं
मियांदादने ‘तो’ ऐतिहासिक षटकार मारल्यावर चेतन शर्माबरोबर…