नवी दिल्ली। पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केल्याबद्दल त्याच्यावर टीका करणाऱ्यांना त्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या रावळपिंडी एक्स्प्रेसचे स्वतःचे अधिकृत यूट्यूब चॅनल आहे जेथे तो बर्याचदा कडक शब्दांमध्ये क्रिकेटच्या घटनाक्रमाचे विश्लेषण करतो. परंतु त्याने अनेकदा भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उर्वरित भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे.
अख्तरने टीकाकारांवर केली टीका
अख्तरची ही पद्धत त्याच्या समीक्षकांना बर्याच वेळा आवडलेली नाही आणि आधुनिक युगातील विराट हा एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे आणि त्याचा खेळण्याचा अंदाज खूपच छान आहे, असे म्हणण्यात अख्तरने कसलीही कसर सोडली नाही.
त्याने क्रिकेट पाकिस्तानशी झालेल्या संभाषणात सांगितले, “मी भारतीय खेळाडू आणि विराट कोहलीचे कौतुक का करू नये? पाकिस्तानमध्ये किंवा जगभरात विराटच्या जवळ येणारा एखादा खेळाडू आहे का?”
कोहली भारतीय आहे म्हणून लोक द्वेष मनात ठेवतात
तो म्हणाला, “लोक का रागावले आहेत हे मला माहिती नाही, त्यांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आकडेवारीकडे पाहायला हवे. त्यांना द्वेष मनात ठेवायचा आहे का? तो फक्त भारतीय आहे म्हणून आम्ही त्याची स्तुती करणार नाही का?”
विराटने सध्या भारतीय संघासाठी सर्वोच्च स्तरावर ७० शतके झळकावली आहेत. या बाबतीत तो सचिन तेंडुलकर नंतर दुसर्या क्रमांकावर आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी, दिल्ली येथे जन्मलेल्या विराटच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे आणि भविष्यात आणखी विक्रम मोडण्याची आशा आहे.
कोहलीच्या आसपास कोणीही नाही
अख्तर म्हणाला “विराटकडे सध्या ७० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कोण आहे ज्याची इतकी शतके आहेत? त्याने भारतासाठी किती मालिका जिंकल्या आहेत? मी त्याची स्तुती का करू नये?”
टी२० मध्ये विराट हा आतापर्यंतचा आघाडीचा फलंदाज आहे. त्याने २४ अर्धशतकांसह ५०. ८० च्या सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत. वनडे सामन्यात तो ४३ शतके आणि ५८ अर्धशतकांसह प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. याखेरीज विराटने कसोटी क्रिकेटमध्ये २७ शतकेही ठोकली आहेत.
शनिवारी १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२० हंगामासाठी विराट सध्या तयारीत मग्न आहे. विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाकडून खेळत असून तो संघाचा कर्णधार आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आले नाही. या हंगामात ते आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकाविण्याचा प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-बॅट दुरुस्त केलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर आला पुढे; केली ‘ही’ मदत
-या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या क्रिकेट बोर्डाला म्हणाले, ‘उशीर होण्याआधीच क्रिकेटला वाचवा’
-इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्हावेत ‘हे’ बदल, या दिग्गजाचा सल्ला
ट्रेंडिंग लेख-
-…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
-बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
-आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत