इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान (England vs Pakistan) संघात 3 सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मुलतान कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला सतत येणाऱ्या टीकांचा सामना करावा लागत आहे. तसेच आता पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कामरान अकमल (Kamran Akmal) म्हणाला की, “मुल्तान कसोटीत पाकिस्तानच्या पराभवावर कोणाचाही विश्वास नाही. आता पाकिस्तान स्थानिक संघ बनला आहे. क्लब संघ यापेक्षा चांगले क्रिकेट खेळतात. आम्ही फक्त छोट्या संघांविरुद्ध जिंकतो, पण मोठ्या संघांविरुद्ध विजयापासून दूर राहतो. संपूर्ण जग आमच्या संघावर हसत आहे. आपल्या देशात खेळाडू आपल्या वैयक्तिक रेकाॅर्ड्ससाठी खेळतात, ते आपल्या संघाचा विचार करत नाहीत.”
पुढे बोलताना अकमल म्हणाला की, “जे खेळाडू कर्णधाराचे आवडते आहेत, त्यांना कोणत्याही कामगिरीशिवाय सतत संधी मिळत आहेत. आता अशी वेळ आली आहे, जेव्हा जगभरातील संघ रेकाॅर्ड करण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध खेळतात.”
मुल्तान कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानने 556 धावा केल्या होत्या, पण तरीही पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी निराशाजनक पराभव केला. अशा प्रकारे, पाकिस्तान कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याने पहिल्या डावात 550 धावा केल्या, पण पराभव वाचवता आला नाही. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामनाही मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर (15 ते 19 ऑक्टोबर) दरम्यान खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; कसोटी मालिकेत कोहली रचणार इतिहास! पुजारा, सेहवागला टाकणार मागे
T20 World Cup; भारत पोहोचणार सेमीफायनलमध्ये? असे असणार समीकरण
बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टाॅप-5 गोलंदाज