ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. या विश्वचषकात यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. त्याचवेळी भारताचे शेजारी राष्ट्र असलेला पाकिस्तान अटींसह या स्पर्धेत उतरताना दिसेल. विश्वचषकापूर्वी देखील त्यांनी आता एक अट ठेवली असून त्यानंतरच त्यांचा संघ भारतात येईल.
पाकिस्तान भारताविरुद्धचा आपला सामना अहमदाबाद येथे खेळेल. तर कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व बेंगलोर येथे प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे मुंबई व पुणे येथे पाकिस्तानचा एकही सामना नियोजित केला गेला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानने उपांत्य फेरी धडक मारली आणि त्यांचा सामना मुंबई येथे जरी नियोजित असला तरी, तो सामना बदलून कोलकाता येथे खेळण्यात येईल.
पाकिस्तान संघ भारतात येण्याआधी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व पाकिस्तान सरकार यांचे एक संयुक्त सुरक्षा पथक भारतात दाखल होईल. हे पथक ज्या शहरांमध्ये पाकिस्तान संघ खेळणार आहे, त्या शहरांमध्ये जाऊन सुरक्षेचा आढावा घेईल. हे पथक पाकिस्तानी खेळाडू राहणारे हॉटेल्स, चाहत्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच व्हिसा या सर्व गोष्टींची पाहणी करून पाकिस्तान सरकारला आपला अहवाल सादर करेल.
पाकिस्तान संघाने वेळापत्रकाच्या आधीच स्पष्ट केले होते की, ते महाराष्ट्र व उत्तर भारतात एकही सामना खेळण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांचे सामने दक्षिण भारतात खेळवले जातील. पाकिस्तान संघाने 2016 टी20 विश्वचषकातील सामने देखील कोलकाता येथेच खेळले होते.
(Pakistan Government Sends Security Deligation To India Before ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
‘मी तर हार्दिक पंड्याच्या आसपासही नाही…’, संघातून ड्रॉप करण्यावर प्रमुख खेळाडूचे खळबळजनक विधान
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय