यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात दाखव होण्यासाठी तयार आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून त्यांना विजा मिळत नसल्यामुळे शेजारी राष्ट्राचे खेळाडू अद्याप भारतात दाखल झाले नाहीत. सोमवारी (25 सप्टेंबर) पीसीबीने विजाच्या मुद्यामुळे आयसीसीकडे चिंता व्यक्त केली. सोबतच संघाच्या सरावावर यामुळे प्रभाव पडत असल्याचेही पीसीबीने म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितल्याप्रमाणे त्यांचा संघ अजूनही इस्लामाबादमध्ये विजाची वाट पाहत आहेत. भारताच्या उच्चायुक्तालयाकडून अद्यावर विजाला परवानगी मिळाली नाहीये. पाकिस्तानला सराव सामन्यासाठी हैदराबादला पोहोचायचे आहे. पण त्याआधी पीसीबीने दुबईमध्ये ‘टीम बाँन्डिंग’साठी खास सत्र आयोजित केले होते. विजा वेळेत न मिळाल्यामुळे हे सत्र रद्द करावे लागले. हैदराबादमध्ये 29 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत.
पीसीबीचे प्रवक्ते सोमवारी उमर फारूख माध्यमांशी बोलताना म्हणाला, “पाकिस्तान संघाला विश्वचषकासाठी भारताचा विजा मिळण्यासाठी खूपच जास्त वेळ लागला आहे. मागच्या एक आठवड्यापासून आम्हाला असंच सांगितलं जात आहे की, पुढच्या 24 तासात विजा मिळेल. पण अजूनपण आम्ही वाट बघत आहोत. आम्हाला असं समजलं आहे की, भारताच्या गृह मंत्रालायकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाहीये.”
दरम्यान, पाकिस्तान संघाने भारतात आयोजित खेलेल्या 2016 टी-20 विश्वचषकातही भाग घेतला होता. दोन्ही संघ मागच्या जवळपास 10 वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. राजकिय संघर्षामुळे दोन्ही देशामधील लढत फक्त विश्वचषक आणि आशिया चषकात पाहायला मिळते. दरम्यान, आगामी वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पाकिस्तानला आपला पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आयोजित केला गेला आहे. (Pakistan has expressed its concern to the ICC due to non-availability of India’s visa)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपच्या सर्वच VIP सामन्यांचे यजमानपद मिळालेले श्री नरेंद्र मोदी स्टेडियम
‘किलर मिलर’ ठरणार वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तारणहार? त्याची बॅट भारतात बोलतेच