भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आगामी नोव्हेंबर महिन्यात बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांबद्दल आतापासून माजी दिग्गज खेळाडू भविष्यवाणी करताना दिसत आहेत. आता पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीने (Jason Gillespie) भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले की, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायनसारखा दिग्गज खेळाडूंनी भरलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतावर भारी पडेल.
जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) म्हणाले की, “मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पाठिंबा देईन आणि मला विश्वास आहे की, ते काम करू शकतात. ते देशातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, त्यांचे रेकॉर्ड त्यांच्या यशाची कहाणी सांगतात. लायनची उपस्थिती ही संघासाठी खूप मजबूत स्थिती निर्माण करते.”
पुढे बोलताना गिलेस्पी म्हणाले, “भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि गेल्या काही काळापासून ते कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी अलीकडच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे, परंतु मला वाटते की यावेळी ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाला पराभूत करण्याची संधी आहे.”
बॉर्डर गावसकर मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
मात्र 132 धावा दूर! भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज करणार ‘विश्वविक्रम’
केएल राहुलला संघात स्थान का? भारतीय कर्णधाराने केला मोठा खुलासा
भारताने 5व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव, फायनलमध्ये चीनला पछाडले