चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडीच्या मैदानांवर खेळवले जातील. तर, टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. स्पर्धा सुरू होण्यास आता फक्त काही दिवस बाकी आहेत. दरम्यान, पाकिस्तानने एक मोठे पाऊल उचलले आहे. खरं तर, पाकिस्तान सरकारने देशात होणाऱ्या आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरक्षा वाढवण्यासाठी लष्करी आणि निमलष्करी रेंजर्सच्या वापराला मान्यता दिली आहे.
संघीय मंत्रिमंडळाने या मेगा इव्हेंटसाठी एक मजबूत सुरक्षा योजना मंजूर केली आहे, ज्यामध्ये सैन्य आणि रेंजर्सचा वापर केला जाईल. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील मैदाने आणि टीम असणाऱ्या हॉटेल्समध्ये सुरक्षा पुरवण्यासाठी सरकारने कमांडो युनिट्ससह 10,000 हून अधिक पोलिस आधीच तैनात केले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी हे देशाचे गृहमंत्री देखील आहेत. ते स्पर्धेच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर वैयक्तिकरित्या देखरेख करत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने या स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. सुरक्षेशी तडजोड न करता सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सुरळीत प्रवेश कसा मिळवायचा याबद्दल नक्वी यांनी वरिष्ठ सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आयसीसी स्पर्धेच्या सुरक्षेसाठी विशिष्ट संख्येने लष्करी आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी तैनात केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक
19फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – अंतिम सामना – गद्दाफी स्टेडियम, लाहोर (जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तर दुबई हे ठिकाण असेल)
हेही वाचा –
IND vs ENG; रोहितने शतक झळकावून केला कमबॅक! विराटचा खराब फाॅर्म कायम
IND vs ENG; हिटमॅनचे धमाकेदार शतक, वनडे मालिका भारताच्या खिशात
IND vs ENG; हिटमॅनचा धमाका! भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा धोबीपछाड






