भारताविरूद्ध सलग मोेठे पराभव स्विकारावे लागलेल्या पाकिस्तान संघावर चहुबाजूने टिका करण्यात येत आहे. एशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने देखील सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी झुंजवले होते.
भारताविरूद्धच्या दोन मोठ्या पराभवानंतर पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना म्हटले, भारतीय संघ आपले फलंदाजी व गोलंदाजीतील नियोजन प्रत्यक्षात उतरवत आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या संघाला देखील आवश्यकता आहे.
बांग्लादेशाविरूद्ध जिंकायचे असल्यास आपल्याला भारतीय क्रिकेटमधील व्यवस्थेकडून शिकणे गरजेचे असल्याचे पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने म्हटले आहे.
जेव्हा आपण संघ बांधत असतो तेव्हा खेळाडूंना पुरेशी संधी देण्याची गरज असते. सतत खेळाडू बदलल्याने त्यांच्या आत्मविश्वास कमी होतो. तर नविन आलेल्या खेळाडूवरही दबाव असतो. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापनाची तसेच कर्णधाराची असते.
भारताने खेळाडूंना पुरेशी दिल्याने ते सध्या जगातील सर्वात चांगला संघ म्हणून पुढे आले आहेत.
बुमराह आणि भुवनेश्वरच्या गोलंदाजीची प्रशंसा करताना शोएब मलिक म्हणाला की त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.
270 सामन्यांचा अनुभव असणाऱ्या शोएब मलिकला स्वत: चांगली कामगिरी करून इतर खेळाडूंचा अात्मविश्वास वाढवण्यास मदत करावी लागणार आहे.त्य़ा शिवाय पाकिस्तानला ही स्पर्धा जिंकणे शक्य होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–महाराष्ट्राचे राज्यस्तरीय कबड्डी पंच शिबीर २८सप्टेंबरपासून तीन दिवस पुण्यात
–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
–टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव