---Advertisement---

T20WC2026: श्रीलंकेवर विजय मिळवूनही पाकिस्तानचा पराभव; टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर! न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

On: शनिवार, फेब्रुवारी 28, 2026 11:04 PM
---Advertisement---

ग्रुप 2 मधील शेवटचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान (Shrilanka vs Pakistan) यांच्यात पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 212 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही चोख प्रत्युत्तर दिले, मात्र 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सवर 207 धावांपर्यंतच त्यांना मजल मारता आली. श्रीलंकेचा 5 धावांनी पराभव झाला असला, तरी या विजयानंतरही पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मधून बाहेर पडला आहे.

टॉस गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सलामीवीरांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. साहिबजादा फरहानने 60 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान 166.67 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 9 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तसेच फरहानला साथ देताना फखरने 42 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 84 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय पाकिस्तानचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही, ज्यामुळे पाकिस्तानचा डाव 212 धावांवर मर्यादित राहिला. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कर्णधार दासुन शनाकाने 2 फलंदाजांना बाद केले.

213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पथुम निसांका केवळ 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर कामिल मिशाराने 26 तर चरिथ असलंका याने 25 धावांची खेळी केली. मधल्या फळीत पवन रथनायकेने 58 धावांची तुफानी खेळी करून श्रीलंकेच्या आशा जिवंत ठेवल्या.

शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार दासुन शनाकाने मैदानात फटकेबाजीचा पाऊस पाडला, त्याने अवघ्या 31 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 षटकार ठोकले. मात्र, एवढी मोठी झुंज देऊनही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. श्रीलंकेचा संघ 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि केवळ 5 धावांनी हा सामना हरला. याबरोबरच पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे आणि न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---