क्रिकेटविश्वात सध्या एकाच गोष्टीची सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे विराट कोहलीचा फॉर्म. त्याच्या मागील कामगिरीवर अनेक आजीमाजी क्रिकपटूंनी आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यातच भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी केलेल्या विधानाचे पाकिस्तानच्या खेळाडूने समर्थन केले आहे.
कपिल देव (Kapil Dev) यांनी ‘विराटला संघाच्या बाहेर काढा’ असे म्हटले होते. या विधानाला पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने समर्थन दर्शविले आहे.
२०१९च्या विश्वचषकानंतर विराट कोहली (Virat Kohli) धावा करण्यात अपयशी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्याने कोणतीही अशी विशेष खेळी केली नाही ती लक्षात राहिल अथवा सामना जिंकून देण्यात उपयोगी ठरली. काही दिवसांपूर्वी कपिल माध्यामांशी बोलताना म्हटले, “जर फिरकीपटू आर अश्विनला संघाबाहेर काढले जाते. तर मग असेच विराटच्या बाबतीत का होत नाही. त्याला टी२० संघातून का काढले जात नाही.”
कपिल यांच्या या विधानावर कनेरिया म्हणाला, “अश्विनला बाहेर केले जाते, मग विराटलाही संघाबाहेर का करत नाही. निवड समिती खेळाडूंच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेत नसल्याने यामध्ये खेळाडूंचे नुकसान होत आहे. अशामध्ये अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा आणि सुर्यकूमार यादव यांनी बोर्डाला विश्वास द्यायला हवा की ते भारतीय क्रिकेटमध्ये प्रमुख भुमिका बजावू शकतात.”
दुसरीकडे बाबर आझम याने याबाबतीत विराटची साथ दिली आहे. त्याने ट्विटरवर विराटसोबतची फोटो पोस्ट करत त्याला ‘हे दिवस पण जातील. मजबूत राहा.’ असे कॅप्शन दिले आहे.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीही विराटची साथ दिली आहे. गांगुली यांनी जे विराटवर टीका करत आहेत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, विराटची आकडेवारी पाहा. त्याच्याकडे गुणवत्ता आहे म्हणून तो इथवर आला आहे. तसेच त्याने बाहेरच्या आवाजांकडे दुर्लक्ष करावे.
इंग्लंडचा मर्यादित षटकाच्या संघाचा कर्णधार जोस बटलर याने विराटवर ज्याप्रकारे टिका होत आहे, त्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर हा मालिका निर्णायक सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकल्याने मालिका बरोबरीत आली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये विराट, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच त्यांना वनडे मालिकेसाठी ही संघातून वगळले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये मोडीत निघणार ‘हे’ १० विक्रम, वाचा भारत कोणत्या बाबतीत आहे आघाडीवर
माजी दिग्गजाने हेरली विराटमधील कमतरता! म्हणाला, ‘शैलीमध्ये काहीच कमी नाही, पण…’
याला काय अर्थय! भारतीय खेळाडूंना साधे कॅचही पकडता येत नाहीत, ६ सामन्यात सोडलेत ‘एवढे’ झेल