आशिया चषकातील शेवटच्या लीग सामन्यात पाकिस्तान संघाने हाँगकाँग संघावर एकतर्फी विजय मिळवला. विशेष म्हणजे पाकिस्तानी संघाने मिळवलेला 1545 धावांचा विजय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा (धावांनी) विजय आहे. मात्र, या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या कामगिरीपेक्षा सामना जिंकल्यानंतर केलेल्या कृत्यामुळे त्यांचे जास्त कौतुक होत आहे.
Selfies, autographs and post-match chats 🤳✍️
Off the field 🤝#AsiaCup2022 | #PAKvHK pic.twitter.com/4QDO6XB4og
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 2, 2022
सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू थेट हाँगकाँगच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन पोहोचले. त्यानंतर त्यांनी हाँगकाँगच्या खेळाडूंसोबत हातमिळवणी करत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे भारत विरुद्ध हाँगकाँगच्या सामन्यानंतरही भारताने हाँगकाँगच्या ड्रेसिंग रुममध्या जाऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे आता पाकिस्तानी खेळाडूंनी टीम इंडियाची नक्कल केल्याचे समोर आले असल्याची टीका केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आता श्रीलंका अफगाणिस्तानची जिरवणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘ही’ तगडी इलेव्हन उतरवणार
‘दादा’ची दादागिरी सुरू होण्यापूर्वीच संपली! ‘या’ कारणामुळे गांगुलीने घेतली एलएलसीमधून माघार
आनंदी आनंद गडे! अखेर विनोद कांबळीला मिळाली नोकरी, आता थेट कोटींमध्ये करणार कमाई