---Advertisement---

‘या’ कारणामुळे भारत सध्या जगातील अव्वल संघ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले मनभरून कौतुक

---Advertisement---

आधी क्रिकेटपटू त्यांनतर नेता आणि आता पंतप्रधान होण्याचा इमरान खान यांचा प्रवास फार रोमांचक आहे, त्याचप्रमाणे ते एक चांगला कर्णधार म्हणून देखील ओळखले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने विश्वविजेता होण्याचे स्वप्न देखील साकार केले आहे. अलिकडेच भारतीय संघाची इमरान खान यांनी स्तुती केली आहे.

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटले आहे की मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे भारत जगातील सर्वोच्च क्रिकेट संघांपैकी एक संघ बनत आहे.

इस्लामाबादमध्ये मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आज भारताला पाहा, ते जगातील अव्वल क्रिकेट संघ बनत आहेत. कारण त्यांच्या संघाने त्यांच्या रचनेत खूप सुधारणा केल्या आहेत. कोणत्याही संरचनेत काम करण्यासाठी कौशल्ये तपासायला वेळ लागतो. परंतु माझा विश्वास आहे की आमचा संघ देखील जगातील अव्वल संघ बनू शकेल.”

सोबतच इमरान खान यांनी पाकिस्तान संघाबद्दलही मते मांडली. ते म्हणाले की, “पाकिस्तान हा देखील एक चांगला संघ आहे. परंतु, क्रिकेटच्या रचनेत संघात सुधारणा होत नसल्याने तो जगातील एक वर्चस्व असलेला संघ होऊ शकला नाही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘माझ्याकडे जास्त वेळ नसल्याने या खेळासाठी द्यायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. सध्या आपल्या देशातील बिघडणारी परिस्थिती कशा प्रकारे हाताळता येईल याकडे मी अधिक माझं लक्ष देत आहे.’

इमरान खान यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत ८८ कसोटी सामने खेळले असून ३८०७ धावा काढल्या आहेत तसेच ३६२ विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर १७५ एकदिवसीय सामन्यात ३७०९ धावा केल्या आहेत आणि १८२ विकेट्स हस्तगत करण्यास ते यशस्वी ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी पाहण्याची चाहत्यांना संधी; ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश

काय सांगता! ८९ कसोटीत विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत; तर रोहित मात्र…

टी२० क्रमवारीत केएल राहुलला मोठा फायदा, पोहचला दुसऱ्या स्थानी; तर विराट कोहली ‘या’ क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---