---Advertisement---

काय सांगता! ८९ कसोटीत विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत; तर रोहित मात्र…

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 12:13 AM
---Advertisement---

फिरकी गोलंदाजांना खेळण्याची कला ही भारतीय फलंदाजांना चांगलीच जमते. भारतात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो. अशातच फलंदाज स्वीप शॉट नाहीतर स्टेप आऊट करून खेळण्याच्या प्रयत्नात असतात आणि अशातच ते यष्टिरक्षकाच्या हातून यष्टीचीत होतात. खूप कमी फलंदाज आहेत, जे फिरकी गोलंदाजांना खेळत असताना खुप कमी वेळेस यष्टीचीत झाले आहेत. यात भारतातील दिग्गज फलंदाजांचा देखील समावेश आहे.

मात्र, सध्या इंग्लंड विरुद्ध भारत संघात चेन्नई येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे २ फलंदाज दुसऱ्या डावात यष्टीचीत झाले. यात रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे. रोहित शर्मा आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३६ वा कसोटी सामना खेळत आहे. यात तो तिसऱ्यांदा यष्टीचीत झाला आहे. तर युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या १८ व्या सामन्यात पहिल्यांदा यष्टीचीत झाला आहे.

रोहित शर्मा २६ धावांवर फलंदाजी करत असताना जॅक लीच याने टाकलेल्या चेंडूवर शॉट खेळताना क्रिजच्या बाहेर होता. अशातच यष्टिरक्षक बेन फोक्स याने चपळाईने त्याला यष्टीचीत केले. त्यानंतर रिषभ पंत हा देखील लीचच्या चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात बेन फोक्स याच्या हातून यष्टीचीत झाला.

सचिन-द्रविड केवळ एकवेळा यष्टीचीत

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने खेळलेल्या २०० कसोटी सामन्यात फक्त एकदाच यष्टीचीत झाला आहे.२००१ साली सचिन तेंडुलकर आपला ८९ कसोटी सामना खेळत असताना लेग स्पिनर एश्ले जाइल्स याच्या गोलंदाजीवर जेम्स फोस्टर याने सचिन तेंडुलकर याला ९० धावांवर यष्टीचीत केले होते. तर दुसरीकडे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड हा देखील १६४ कसोटी सामन्यात एकदाच यष्टीचीत झाला आहे. २००२ मध्ये जाईल्सच्या चेंडूवर एलेक स्टीवर्ट याच्या हातून स्टम्पिंग होत बाद झाला होता.

विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत –

भारताचा फलंदाज विराट कोहलीने आत्तापर्यंत ८९ कसोटी सामने खेळले आहेत. यात तो एकदाही यष्टीचीत झाला नाही. तो त्याच्या कसोटी कारकिर्दीत अनेकदा झेलबाद, पायचीत अगदी एकदा हिटविकेटमुळेही बाद झाला आहे. मात्र, तो त्याच्या कारकिर्दीत कधीही कसोटीमध्ये यष्टीचीत झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० क्रमवारीत केएल राहुलला मोठा फायदा, पोहचला दुसऱ्या स्थानी; तर विराट कोहली ‘या’ क्रमांकावर

आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला

आयपीएल २०२१ पूर्वी पंजाबच्या संघाने घेतला मोठा निर्णय, करणार ‘हा’ महत्वपूर्ण बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---