गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41वा सामना पार पडला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे पाकिस्तानसाठी विश्वचषकात मोठे संकट उभ केले आहे. आता क्वालिफाय करण्यासाठी त्यांना इंग्लंडला खूपच मोठ्या अंतराने पराभूत करावे लागेल, जे थोडे कठीण आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने पाकिस्तानला विजयासाठी एक विचित्र पद्धत सांगितली आहे.
विचित्र सल्ला
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (New Zealand vs Sri Lanka) सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यादरम्यान त्याला पाकिस्तानच्या पात्रता समीकरणाविषयी प्रश्न विचारला. त्याचे विचित्र उत्तर देत तो म्हणाला, “पाकिस्तानने पहिली फलंदाजी केली पाहिजे आणि जेवढ्या धावा होतील, तेवढ्या कराव्या. जेव्हा इंग्लंडची वेळ येईल, तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बंद करावे. जेणेकरून ते टाईम आऊट होतील आणि पाकिस्तान हा सामना जिंकेल.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1722795534493401535
पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीत पोहोचायचे आहे. त्यासाठी त्यांना 300 धावांनी काहीच फरक पडणार नाही, पण त्यांना ही धावसंख्या बनवायची असेल, तर इंग्लंडला 13 धावांवर सर्वबाद करावे लागेल. पाकिस्तानने जर 400 धावा केल्या, तर त्यांना 112 धावांवर इंग्लंडला रोखावे लागेल. 450 धावा केल्या, तर 162 धावांवर इंग्लंडला नमवावे लागेल. असे करण्यासाठी पाकिस्तान संघाला वनडे क्रिकेटमध्ये टी20सारखी फलंदाजी करावी लागेल.
कधी आहे इंग्लंड-पाकिस्तान सामना?
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (England vs Pakistan) संघातील सामना शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशात इंग्लंड पाकिस्तानला पराभूत करत त्यांच्या उपांत्य फेरी पोहोचण्याच्या आशांवर पाणी फेरेल. (pakistan should lock england players in dressing room they win by time out semifinal said wasim akram CWC 2023 read)
हेही वाचा-
खुलासा! मॅक्सवेलने मानलेली हार; म्हणालेला, ‘मला निवृत्त व्हायचंय’, पण फिजिओच्या ‘या’ सल्ल्याने घडवला इतिहास
कुणी तरी येणार येणार गं! विराट लवकरच दुसऱ्यांदा बनणार बाबा, बेबी बंपमध्ये दिसली अनुष्का- Video






