लंडन। गुरवारपासून लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने पाकिस्तानच्या खेळाडूंना स्मार्ट वॉच घालण्यापासून रोखले आहे.
याबद्द्ल पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली म्हणाला, “मला माहित नाही कोणी स्मार्ट वॉच घातले होते, पण आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी आम्हाला येऊन सांगितले की याची परवानगी नाही. पुढच्यावेळी कोणीही स्मार्ट वॉच घालणार नाही.”
स्मार्ट वॉच मैदानावर वापरण्याच्याबाबतीत आयसीसीने आज प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांना पीएमओएच्या (Player and Match Officials Area) क्षेत्रात आणि मैदानात स्मार्ट वॉच वापरण्याची परवानगी नाही.
मागील काही वर्षांपासून क्रिकेटला भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना त्यांचे फोन सामना सुरू होण्याआधी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे सुपुर्त करावे लागतात. खेळ संपल्यावर त्यांना त्यांचे फोन परत केले जातात.
आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात दिले आहे की “स्मार्ट वॉच फोन/वायफायशी जोडले जाऊ शकतात किंवा ते संदेश वहनाचेही काम करू शकतात. त्यामुळे ते वापरण्याला परवानगी नाही. आम्ही खेळाडूंना अशी साधने मैदानावर जाण्यापूर्वी जमा करण्याची आठवण करून देतो.”
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तान 1 बाद 50 धावांवर खेळत आहे तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 184 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–श्रीलंकन खेळाडूच्या वडीलांची हत्या, वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार
–एबी आधी ५ वर्ष आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ५ खेळाडू आजही खेळत आहे क्रिकेट
–आयपीएलमध्ये नाकारले, या लीगने केले स्मिथला आपले
–कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची वनडेत तुफानी फटकेबाजी
–सलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !