कोलंबो। श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू धनंजया डी सिल्वा याने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्या वडिलांची हत्या झाली हे त्यामागचे कारण आहे. त्याचे वडिल रंजन डी सिल्वा हे एक स्थानिक राजकारणी होते. त्यांची 24 मे ला कोलंबो येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी निघणार आहे. यामध्ये 3 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तसेच तिसरा कसोटी सामना दिवस रात्र असा बार्बाडोस येथे होणार अाहे.
पहिला कसोटी सामना 6 जूनला पोर्ट अॉफ स्पेन येथे होणार अाहे.
Condolences to the family. Our thoughts and prayers with Dhananjaya. He was due to be on a plane looking forward to a tour to the West Indies. https://t.co/FKrGfAd0ws
— Kumar Sangakkara (@KumarSanga2) May 25, 2018
26 वर्षीय डी सिल्वाने अातापर्यंत 13 कसोटी सामने खेळले असून त्यात 46.34 च्या सरासरीने 1066 धावा केल्या आहेत.
मागच्या वर्षी कसोटीत पुनरागमन करताना दक्षिण अाफ्रिके विरूध्द झालेल्या मालिकेत त्याने निराशाजनक कामगिरी केली होती.
मात्र भारत विरूध्दच्या दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने शतक केले होते आणि बांग्लादेश विरूध्द कसोटी सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना 173 धावा केल्या होत्या. ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावासंख्या ठरली आहे.
तसेच अजून श्रीलंका क्रिकेटने बदली खेळाडूची घोषणा नाही केली.
महत्त्वाच्या बातम्या-
–एबी आधी ५ वर्ष आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ५ खेळाडू आजही खेळत आहे क्रिकेट
–आयपीएलमध्ये नाकारले, या लीगने केले स्मिथला आपले
–कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची वनडेत तुफानी फटकेबाजी
–सलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !
–चेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल!






