ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात यजमान भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वर्षातील हा सर्वात मोठा सामना असल्याचे म्हटले जाते. उभय संघातील सामने हे नेहमीच काट्याचे राहिले आहेत. दोन्ही देशातील चाहते दोन्ही संघांना मैदानावर पाहण्यास नेहमीच उत्सुक असतात. आता विश्वचषकाचे वेळापत्रक देखील आले असून, सर्व तयारी सुरू असताना पाकिस्तानच्या क्रीडामंत्र्यांनी एक मोठे विधान केले आहे.
आगामी विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. पाकिस्तान संघाचे इतर सामने मात्र दक्षिण भारतात होणार आहेत. मागील जवळपास पाच-सहा महिन्यापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक व विश्वचषक सामन्यांबद्दल मोठी साशंकता निर्माण झाली होती. आशिया चषक यापूर्वी पाकिस्तानमध्ये होणार होता. मात्र, बीसीसीआयच्या विरोधामुळे आशिया चषक श्रीलंका व पाकिस्तानात होईल. यामध्ये पाकिस्तानात भारतीय संघ सामना खेळणार नाही.
त्यानंतर पाकिस्तानी देखील आपला संघ विश्वचषकासाठी भारतात न पाठवण्याची भूमिका घेतलेली. मात्र, अखेरीस त्यांनी माघार घेत विश्वचषकात सहभाग नोंदवण्याचे निश्चित केले. मात्र, असे असतानाच आता पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान मजारी यांनी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,
“भारतीय संघाने आशिया चषकासाठी तटस्थ ठिकाणाची मागणी केली आहे. भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर, आम्ही पाकिस्तानचा संघ भारतात पाठवणार नाही. अन्यथा, आम्ही देखील तटस्थ ठिकाणी सामना खेळू.”
पाकिस्तान संघ भारतात खेळणार की नाही याचा निर्णय पीसीबी व पाकिस्तान सरकारची सुरक्षा समिती घेईल.
(Pakistan Sports Minister Said We Not Participating In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका बनली क्वालिफायर्स चॅम्पियन! अंतिम सामन्यात उडवला नेदरलँड्सचा खुर्दा
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान