---Advertisement---

“पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा”, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 8:31 PM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमध्ये 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडत आहे. अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. तसेच दुसर्‍या सामन्यात देखील ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पाकिस्तान संघ संपूर्ण मालिकेत खराब कामगिरी करत आहे. पाकिस्तानच्या या कामगिरीवर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली आहे. यादरम्यानच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान संघाची तुलना शालेय संघासोबत केली आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत शोएब म्हणाला, “पाकिस्तानचा संघ प्रत्येक वेळी सामान्य दर्जाच्या खेळाडूंना खेळवणार व सामान्य दर्जाचेच निकाल हाती येणार. जेव्हा जेव्हा पाकिस्तान संघ कसोटी सामना खेळेल तेव्हा तेव्हा त्यांची पोलखोल होईल. पाकिस्तान संघ शालेय स्तरावरचे क्रिकेट खेळत असल्याप्रमाणे खेळत आहे. संघ व्यवस्थापनाने त्यांना शालेय स्तरावरचे खेळाडू बनवले आहे. बोर्ड पुन्हा एकदा व्यवस्थापन बदलण्या संदर्भात चर्चा करत आहेत, पण तुम्ही ( खेळाडू) कधी सुधारणार.”

दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार केला असता, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा पहिला डाव 297 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसनच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर 659 धावांचा डोंगर उभा केला.पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाची सुरुवात देखील खराब झाली असून तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी 1 गडी गमावत 8 धावा केल्या होत्या.पाकिस्तान संघ अजूनही 354 धावांनी पिछाडीवर असून, एखादा मोठा चमत्कारच त्यांना पराभवापासून वाचवू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

चौथ्या कसोटीचे आयोजन स्थळ बदलण्याच्या चर्चांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, म्हणाले…

पुन्हा बाहेर जेवणासाठी जाऊ नकोस…! शुभमन गिलला मिळाला मजेशीर सल्ला

“तिसऱ्या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---