मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. असे असूनही तो सामन्याच्या दुसर्या दिवशी चर्चेत आला. सरफराज हा पाकिस्तान संघाचा एक भाग आहे, पण त्याच्या जागी प्लेईग इलेव्हनमध्ये मोहम्मद रिझवान यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका निभावत आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी सरफराज मैदानावर शान मसूदला शूज घेऊन आला. त्याला ‘वॉटर बॉय’ म्हणून ठेवल्याचे पाहून पाकिस्तानी क्रिकेट चाहते भडकवले.
हातात शूज असलेला सरफराजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच पाकिस्तान संघ व्यवस्थापनावरही टीका होत आहे. सोशल मीडियावर या फोटोवर इतका गोंधळ उडाला होता की पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.
मिस्बाह म्हणाला, ”हे अगदी सामान्य आहे, मला वाटत नाही की सरफराजला यात काही अडचण असेल. मी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कर्णधार म्हणून ड्रिंक्स घेऊन मैदानात गेलो आहे, मी त्या सामन्यात खेळत नव्हतो आणि बारावा खेळाडू होतो.”
https://twitter.com/achayaarsun/status/1291473301777403904
काही पाकिस्तानी चाहत्यांनी संघ व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला, तर काहींनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे उदाहरण दिले. हे दोन्ही क्रिकेटर्स मैदानावर ‘वॉटर बॉय’ च्या भूमिकेतही दिसले आहेत.
https://twitter.com/MazherArshad/status/1291394952149307392
https://twitter.com/KAMRANPTI18/status/1291668312183709696
https://twitter.com/fozan_syed/status/1291681154270212096
सामन्याविषयी सांगायचे झाले तर इंग्लंडची धावसंख्या सामन्याच्या दुसर्या दिवसाच्या शेवटी 4 बाद 92 अशी होती, तर पाकिस्तानने पहिल्या डावात 326 धावा केल्या. शान मसूदने 156 धावांची झुंझार खेळी साकरली.
वाचा-