आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा वनडे विश्वचषक यावर्षी भारतात आयोजित केला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विश्वचषकासाठी पूर्ण तयारीत आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हाय व्होल्टेज होणार, यात कुठलीच संका चाहत्यांना नाहीये. पण त्यापूर्वी पाकिस्तान संघाशी संबंधित एक मोठी बातमी हाती लागत आहे. पाकिस्तान संघ आपल्या स्पॉन्सर कंपन्यांना बॉयकॉट करू शकते.
वनडे विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशात खेळाडूंनी आपली नाराजी दाखवण्याचे ठरवले, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ही बाब चिंतेची ठरू शकते. खेळाडूंकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघाच्या स्पॉन्सर कंपन्यांना बॉयकॉट करण्यामागे मोठे कारण असल्याचे समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार मागच्या चार महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या एकाही क्रिकेटपटूला वेतन मिळाले नाहीये. याच कारणास्तव संघ आपला राग स्पॉन्सर कंपन्यांवर काढू शकतात.
माध्यमांतील वृत्तांनुसार पाकिस्तानचे स्टार खेळाडू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद सिरझवान यांना जवळपास 13 लाख रुपये मासिक वेतन मिळणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठलाच कागदोपत्री व्यावहार झाला नाहीये. या सर्व प्रकाराला संघातील खेळाडू त्रासले अहेत, असेही सांगितले जात आहे. काही खेळाडूंच्या मते, ते देशासाठी विनामोबदला खेळायला तयार आहेत. पण असे असेल तर जर्सीवर असणाऱ्या स्पॉन्सर कंपन्यांना प्रसिद्ध कशासाठी? असा प्रश्न ड्रेसिंग रुममधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघ आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधून सुरू होत आहे. पाकिस्तानला आपाला पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार लढत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. (Pakistan team may boycott its sponsor companies in world cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
‘किलर मिलर’ ठरणार वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तारणहार? त्याची बॅट भारतात बोलतेच
वर्ल्डकप काउंटडाऊन: नंबर 10 असणाऱ्या सचिनची विश्वचषकात नंबर 8 शी गाठ