टी -२० विश्वचषक सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व देशांनी त्यांच्या संघाच्या घोषणेनंतर जय्यत तयारी सुरू केली आहे. टी २० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या फेरीच्या (पात्रता फेरी) सामन्यांपासून होणार आहे. त्यानंतर सुपर १२ सामने २३ ऑक्टोबरपासून खेळले जातील.
सुपर १२ मधील भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होईल. पाकिस्तानने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धीशी स्पर्धा करण्यासाठी लाहोरमधील नॅशनल हाय परफॉर्मेंस सेंटर येथे प्रशिक्षण सुरू केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवारी राष्ट्रीय संघाच्या तयारीची छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहेत. या चित्रांमध्ये संघाचा कर्णधार बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत.
तत्पूर्वी, पाकिस्तान संघाने अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकची टी२० विश्वचषक संघात निवड केली आहे. दुखापतग्रस्त फलंदाज सोहेब मकसूदच्या जागी टी -२० विश्वचषकासाठी निवडलेल्या आपल्या संघात मलिकला समाविष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी (९ ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला होता. पाठीच्या दुखापतीमुळे मकसूद स्पर्धेबाहेर झाला आहे.
भारतीय संघाने २००७ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या टी -२० विश्वचषकात बाजी मारली होती. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तानने २००९ टी २० विश्वचषकात बाजी मारली होती. भारतीय संघाने वर्ष २०१४ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जागा मिळवली होती, पण त्यात भारतीय संघाला श्रीलंकेच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 10, 2021
टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद , शाहीन शाह आफ्रिदी, शोएब मलिक. राखीव: खुशदील शहा, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादीरी.
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर – वि. भारत – दुबई
२६ ऑक्टोबर – वि. न्यूझीलंड – शारजाह
२९ ऑक्टोबर – वि. अफगाणिस्तान – दुबई
२ नोव्हेंबर – वि A2 – अबू धाबी
७ नोव्हेंबर – वि B1 – शारजाह
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियममध्ये १०० कॅमेरे, प्रेक्षकांनी लुटला ३६० डिग्री अँगलचा आनंद
बेंगलोर वि. कोलकाता एलिमिनेटर सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
“… म्हणून मी नेतृत्व सोडले”; स्वतः विराटने केला खुलासा