भारतीय नियमक मंडळाने(बीसीसीआय) सुरक्षिततेच्या कारणाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने डिसेंबरमध्ये होणाऱ्या एशिया एमर्जिंग नेशन्स कपमधील केवळ सहा सामन्यांचेच यजमानपद स्विकारले आहे. अन्य सामने हे श्रीलंका येथे होतील.
याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाला कराची किंवा लाहोरला पाठवण्यास नकार दिला आहे. या स्पर्धेत आशियाई देशातील उदोयोन्मुख प्रतिभा समोर यावी अशी अपेक्षा आहे.
तसेच त्यांनी सांगितले की भारत त्यांचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळेल. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामनाही कोलंबामध्ये होईल.
या स्पर्धेमध्ये बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि हाँगकाँग यांचा पाकिस्तानसह कराची लेगमध्ये समावेश असेल. तर श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तानचे सामने कोलंबो येथे होतील.
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की या स्पर्धेतील पाकिस्तानमधील तीन सामने नूतणीकरण सुरु असलेल्या नॅशनल स्टेडीयमवर होतील आणि तीन सामने साउथहेड क्रिकेट स्टेडियमवर होतील.
ते सुरक्षिततेच्या बाबतीत पुढे म्हणाले, ‘पाहुण्या संघासाठी सुरक्षिततेची पूर्ण योजना आखण्यात आली आहे. तसेच त्याच्या कराचीतील 4 ते 10 डिसेंबर दरम्यानच्या वास्तव्यात त्यांना अव्वल दर्जाची सुरक्षितता पुरवली जाईल.’
पाकिस्तान बोर्डाचे दुसरे अधिकारी म्हणाले ही पाकिस्तानसाठी अव्वल दर्जाची सुरक्षितता पुरवण्याची क्षमता असल्याचे दाखवण्याची चांगली संधी आहे.
ही स्पर्धा 6 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार असून यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेचे 23 वर्षांखालील संघ खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर
–ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच
–का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल