मंगळवारी (दि. 17 जानेवारी) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक स्पर्धेतील 15वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड महिलांनी 53 धावांनी विजय मिळवला. असे असले, तरीही पाकिस्तान महिला संघाची कर्णधार सैयदा अरूब शाह हिने सामन्यादरम्यान असा झेल घेतला, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तिने एकापाठोपाठ एक असे दोन शानदार झेल घेतले. आता तिचे दोन्ही व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
सैयदाने पकडले दोन झेल
पाकिस्तान महिला (Pakistan Women) संघाची कर्णधार सैयदा अरूब शाह (Syeda Aroob Shah) हिने इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान दोन शानदार झेल पकडले. तिने इंग्लंडची सलामीवीर फलंदाज लिबर्टी हीप हिचा पहिला झेल पकडला. तिचा हा झेल अगदी पाहण्यासारखा होता. हा झेल पकडण्यासाठी ती उलट चालत गेली. यानंतर तिने दोन्ही हात पुढे करत हा झेल घेतला. उलट्या दिशेने जात कठीण झेल घेण्याचा क्षण डोळे दीपवणारा होता. हा झेल घेतल्यानंतर सैयदा जमिनीवर पडली. तसेच, लिबर्टी 5 चेंडूत 4 धावा करून तंबूत परतली.
दुसरा झेल इंग्लंडच्या कर्णधाराचा
यानंतर सैयदाने इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिवेन्स हिचा झेल घेतला आणि तिलाही तंबूत पाठवले. हा झेल घेण्यासाठी ती दूर धावली आणि तिने शानदार पद्धतीने झेल पकडला. दुसरा झेल हा डावाच्या पाचव्या षटकात पकडला गेला. हे षटक फिरकीपटू अनोशा नासिर टाकत होती. तिच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सैयदाने हा झेल पकडला. इंग्लंडची कर्णधार यावेळी 21 चेंडूत 24 धावा करून तंबूत परतली.
https://www.instagram.com/reel/CnhK75YohaH/?utm_source=ig_embed&ig_rid=e4b3d8ae-2258-40e9-a1f2-dd3a65f52aaa
इंग्लंडने जिंकला सामना
इंग्लंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 156 धावा कुटल्या. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज सेरेन स्मेल (37) आणि रायना मॅकडोनल्ड (35) यांनी मोलाचे योगदान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाला निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत फक्त 103 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंड महिला संघाने हा सामना 53 धावांनी खिशात घातला. (pakistan u19 women captain syeda aroob shah took shocking catch against england u19 women t20 world cup see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटसाठी खूपच खास आहे न्यूझीलंड मालिका, मोडू शकतो सेहवाग आणि पाँटिंगसारख्या दिग्गजांचा ‘हा’ विक्रम
‘असं वाटलं माझ्याच मुलाला…’, रिषभ पंतच्या अपघातावर माजी निवडकर्त्याचं भावूक वक्तव्य