ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आशिया चषक २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. तर पाकिस्तान संघ त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात २८ ऑगस्टला भारताविरुद्ध करणार आहे. तत्पूर्वी आशिया चषकासाठी पाकिस्तानचा जाहीर करण्यात आला आहे. परंतु या संघ निवडीवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज तौसिफ अहमद नाखुश आहे. त्याने संघ निवडीवरून पाकिस्तानच्या निवड समितीवर खरपूस टीका केली आहे.
आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघात (Pakistan Squad) महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या संघातून वेगवान गोलंदाज हसन अली याला वगळण्यात आले आहे. तसेच अनुभवी शोएब मलिकलाही दुर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे माजी गोलंदाज अहमदचे म्हणणे आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतुलित संघ बनवण्यात अपयशी ठरला आहे.
स्पोर्ट्स पाकटीव्हीवर बोलताना अहमद म्हणाला की, “हे रडगऱ्हाणे फार जुने आहे. तुम्ही संतुलित संघ निवडण्याचा प्रयत्नही नाही केला. काही खेळाडू असे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुनरागमन करत आहेत. जेव्हा अशी कोणती महत्त्वाची स्पर्धा येते, तेव्हा तुम्ही अशा खेळाडूंना निवडता, ज्यांच्याबद्दल तुम्ही स्वतच म्हणालेले असता की यांनी क्रिकेटला रामराम ठोकला पाहिजे. याचा असा अर्थ होतो की, तुमच्याकडे बॅकप्लॅन नाही. जर तुमच्याकडे व्यवस्थित योजना नसतील, तर मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याला काही अर्थ नाही. पाकिस्तान संघात सऊद शकील होता, २-३ खेळाडू आणखी होते. आता ते कुठे आहेत.”
पुढे बोलताना अहमदने दावा करत सांगितले की, पाकिस्तानचा संघ यावेळी संपूर्ण आशिया चषकाऐवजी फक्त भारताविरुद्धच्या सामन्यांच्या विचार करत असेल.
आमची इच्छा आहे की, “आमचा संघ चांगला बनावा. मला वाटले होते की, शोएब मलिकला निवडले जाईल. कारण अशावेळी तुम्हाला याच खेळाडूंची आठवण येते. परंतु आपण वास्तवात आशिया चषकाची पर्वाच करत नाही. आपण केवळ भारताविरुद्धच्या २-३ सामन्यांची पर्वा करतो. जर आपण भारताविरुद्ध जिंकलो, तर बस्स सर्वकाही जिंकल्यासारखे वाटते. ही पद्धत चुकिची आहे. आपण व्यवस्थित योजना बनवणे गरजेचे आहे, असे अहमदने पुढे म्हटले.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-