सध्या आशिया चषकातली सुपर 4 फेरीतील तिसरा चोथा सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संघांमध्ये नियोजित आहे. दोन्ही संघांसाठी हा ेक महत्वाचा सामना आहे. या सामन्यावरून आशिया चषकाच्या अंतिम सामन्याची गणिते स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सामन्याकजे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्मय घेतला.
विशेष म्हणजे या सामन्यात पाकिस्तानी संघाला विजय मिळाल्यास श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा आशिया चषक 2022चा अंतिम सामना निश्चित होऊल. मात्र, आज अफगाणिस्तान संघाने विजय मिळवल्यास भारताच्या आशिया चषकातील आशा जिवंत राहतील. त्यामुळे ईअफगाणिस्तान आणि पाकिस्तान प्रमाणेच सर्व भारतीय चाहत्यांची देखील या सामन्यावर नजर लागून राहिली आहे.
सामन्यासाठी दोन्ही सघाची प्लेइंग 11
🏏 Pakistan win the toss and opt to field first 🏏
Unchanged playing XI for today's match 👇#AsiaCup2022 | #AFGvPAK pic.twitter.com/phposZadWM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 7, 2022
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज
अफगाणिस्तान- हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी(कर्णधार), करीम जनात, रशीद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला सल्ला द्यायला सरसावला पुजारा; म्हणतोय,’तुम्ही हे काम करा’
भारताचा माजी दिग्गज गोलंदाज स्टेशनवर पाहतोय रेल्वेची वाट, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
‘सलग दोन पराभव हे भारतीय संघासाठी चांगले संकेत!’ माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान