सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने कराचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. बाबर आझम गेल्या २ वर्ष १ महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतकाची वाट पाहत होता आणि या मोठया प्रतिक्षेनंतर त्याला यश मिळाले आहे.
बाबर आझमने (Babar Azam) या अगोदर फेब्रुवारी २०२० मध्ये बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी येथे शेवटचे कसोटी शतक झळकावले होते आणि त्या सामन्यात त्याने १४३ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला १२ कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत बाबरने १८० चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याने १८० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या.
एकीकडे त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक होते, तर दुसरीकडे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक होते. त्याचवेळी बाबर आझमचे पाकिस्तानमधील हे तिसरे शतक होते. बाबरने अत्यंत कठीण परिस्थितीत आपले शतक झळकावले.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs PAK) यांच्यातील दूसरा कसोटी सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने २ बाद १९२ धावा केल्या आहेत. ते अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा ३१४ धावांनी मागे आहेत. पाकिस्तानसाठी बाबरने नाबाद १०२, तर अब्दुल्ला शफीकने नाबाद ७१ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९ बाद ५५६ धावा करून डाव घोषित केला होता आणि प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ १४८ धावांवर सर्वबाद झाला होता. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद ९७ धावांवर डाव घोषित करून पाकिस्तानला विजयासाठी ५०७ धावांचे लक्ष्य दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
WWE शोकसागरात! ‘या’ दिग्गज रेसलरचे निधन; ३ वेळा आला होता हृदयविकाराचा झटका
आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळाल्याने परदेशी लीग खेळायला निघाले ‘हे’ ७ भारतीय, विहारीचाही समावेश
टिक टिक बुम! रोहित आणि बुमराह पोहोचले मुंबईत, ‘पलटण’ने शेअर केला झक्कास व्हिडिओ