पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 26 जानेवारी पासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघ तब्बल 14 वर्षांच्या मोठ्या कार्यकाळानंतर पाकिस्तानचा दौरा करणार असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ही मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे पाकिस्तान संघात सध्या बदलाचे वारे सुरू झाले असून या मालिकेसाठी संघ जाहीर करताना व्यवस्थापनाने तब्बल सहा नवोदित खेळाडूंना संघात जागा दिलेली आहे.
पाकिस्तानच्या संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी फिरकीपटू नौमान अली, साजिद खान, वेगवान गोलंदाज तबीश खान, अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज आणि युवा फलंदाज सौद शकील या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघाचे कर्णधारपद बाबर आझमकडे देण्यात आली असून त्याच्यासाठी देखील ही मालिका महत्वाची असणार आहे. दुखापतीमुळे तो मागील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकला होता.
पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह तीन वनडे सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. पाकिस्तान संघाला आशा असेल की घरच्या मैदानावर त्यांचे युवा खेळाडू उत्तम कामगिरी करतील.
असा आहे पाकिस्तानचा संघ –
आबिद अली, इमरान बट, अजहर अली, बाबर आजम (कर्णधार), फवाद आलम, सौद शकील, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, सरफराज अहमद, नौमान अली, साजिद खान, यासिर शाह, हैरिस राउउ, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, तबीश खान
महत्वाच्या बातम्या:
SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत
राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले
मुलीच्या जन्मापेक्षा जास्त आनंद देशाकडून खेळण्यात होता, टी नटराजनचं मन जिंकणार वक्तव्य






