---Advertisement---

पाकिस्तानला मिळाला रिजवानचा उत्तराधिकारी!! विश्वचषकात १० चौकारांसह चोपल्यात १३५ धावा

On: मंगळवार, जानेवारी 18, 2022 5:33 PM
Haseebullah Khan
---Advertisement---

सध्या वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत पाकिस्तान संघाने झिम्बाब्वे संघाला ११५ धावांनी पराभूत करत जोरदार सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज हसीबुल्लाह खानने (Haseebullah Khan) तुफानी खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याला पाकिस्तानचा भविष्यातील यष्टिरक्षक फलंदाज म्हटले जाऊ लागले आहे.

पाकिस्तान संघात मोहम्मद रिजवान हा यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका पार पडतोय. परंतु, असे म्हटले जात आहे की, हसीबुल्लाह खान हा मोहम्मद रिजवानला टक्कर देऊ शकतो. हसीबुल्लाह खानने १५५ चेंडूंमध्ये १३५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ६४ धावा तर अवघ्या १४ चेंडूंमध्ये केल्या होत्या. यासह यष्टिरक्षण करताना त्याने ३ झेल देखील टिपले. हसीबुल्लाह खानने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने झिम्बाब्वे संघासमोर ३१६ धावांचे आव्हान दिले होते.

हसीबुल्लाह खानचा जन्म २० मार्च २००३ रोजी अशा कुटुंबात झाला होता, जिथे त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी क्रिकेट सर्वकाही होते. त्याचे वडील अजीजुल्ला खान (१७ प्रथम श्रेणी सामने) आणि काका हमीदुल्ला खान (२१ प्रथम श्रेणी सामने) क्रिकेटपटू होते. त्याला या दोघांकडून प्रेरणा मिळाली. हसीबुल्लाचा धाकटा भाऊ अब्दुल सबूर बलुचिस्तान १६ वर्षाखालील संघासाठी चमकदार कामगिरी करत आहे.

हसीबुल्ला खानच्या वडिलांचे स्वप्नं होते की, त्यांनी पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करावे. परंतु, त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहून गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाने पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळावे हे स्वप्न पाहिले. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. हसीबुल्ला खानचे वडील हे त्याचे आदर्श आहेत. हसीबुल्लाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक त्याचे वडील होते. त्याने त्याच्या वडिलांकडून खेळाच्या मूलभूत गोष्टी शिकल्या.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३१५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाचा डाव २०० धावांवर संपुष्टात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

‘भावी कर्णधार’ म्हणून राहुलची होतेय चर्चा; मात्र, आकडे पाहून व्हाल निराश; वाचा सविस्तर

नेतृत्व सोडल्यानंतर दिसली विराटची पहिली झलक; सराव सत्राच्या शुभारंभाची क्षणचित्रे व्हायरल

हे नक्की पाहा:

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---