श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ साली पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाले होते. त्यानंतर, २०१५ पासून काही संघ छोटेखानी दौऱ्यांसाठी पाकिस्तानमध्ये जाऊ लागले आहेत. त्याच वेळी आता, पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी व टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिका संघ तब्बल १४ वर्षानंतर पाकिस्तानच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळेल.
ग्रॅमी स्मिथने सुरक्षा व्यवस्थेविषयी केले समाधान व्यक्त
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी या मालिकेसंदर्भात बोलताना म्हटले, “पाकिस्तानसारख्या क्रिकेटवेड्या देशात आमचा संघ खेळणार आहे. आमच्या सर्व खेळाडूंसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. मी क्रिकेट खेळत असताना, तेथील वातावरण अत्यंत शानदार असायचे. ते लोक क्रिकेटवर भरपूर प्रेम करतात.”
पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था व इतर बाबींविषयी स्मिथने समाधान व्यक्त केले. याविषयी बोलताना तो म्हणाला, “मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धन्यवाद देऊ इच्छितो. मागील आठवड्यात ज्यावेळी मी मालिकेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी आमची चांगली व्यवस्था केली होती. सुरक्षेचेPhoto Courtesy: ही उत्तम नियोजन केले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सर्व तयारीवर आम्ही खूष आहोत. या ऐतिहासिक दौऱ्याकडे आम्ही अत्यंत सकारात्मकतेने पाहतोय.”
असा असेल दौरा
दक्षिण आफ्रिका संघ या दौऱ्यावर दोन कसोटी व तीन टी२० सामने खेळेल. दौर्याची सुरुवात २६ जानेवारी पासून होईल. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिका संघ १६ जानेवारीला पाकिस्तानमध्ये दाखल होईल. काही दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर एक आंतरसंघ सराव सामना खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्याची सुरुवात २६ जानेवारीला कसोटी मालिकेने होईल. मालिकेतील पहिला सामना कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. मालिकेतील दुसरा सामना ४-८ डिसेंबर दरम्यान रावळपिंडी येथे होईल. हे दोन्ही सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असतील.
दौऱ्याची अखेर टी२० मालिकेने होईल. मालिकेतील तिन्ही टी२० सामने अनुक्रमे ११, १३ व १४ फेब्रुवारीला खेळविले जातील. हे सामने कराची, रावलपिंडी आणि लाहोरच्या मैदानावर होतील. पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका संघ टी२० क्रमवारीत चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
चौदा वर्षांपूर्वी केला होता अखेरचा दौरा
दक्षिण आफ्रिका संघाने २००७ मध्ये म्हणजेच १४ वर्षापूर्वी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा १-० ने पराभव केलेला. मागील पंधरा महिन्यात श्रीलंका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेनंतर पाकिस्तानचा दौरा करणारा दक्षिण आफ्रिका चौथा संघ ठरला आहे.
संबधित बातम्या:
– बीसीसीआय त्याच्या बाजूने उभी आहे, सूर्यकुमार यादवचे उदाहरण देत पाकिस्तानी खेळाडूचा पीसीसीबीवर निशाना
– ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित
– पंड्याने माध्यमांमध्ये सांभाळून बोलावे, पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाचा सल्ला