पुढील 2026 चा टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने भारत दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अटी खास पद्धतीने मांडल्या आहेत. तर 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा हवाला देत स्पोर्ट्स तकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तान बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाईल. ज्यामध्ये टीम इंडियाचे सामने दुबईमध्ये होणार असल्याचे मान्य केले आहे.
याआधी आलेल्या सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये असे नमूद करण्यात आले होते की, पाकिस्तान बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलला या अटीवर सहमती देईल की यानंतर होणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्येही ते भारत दौऱ्यावर जाणार नाहीत. आता आयसीसीने पीसीबीची ही अट मान्य केली आहे.
पीसीबीच्या अटीनुसार, 2026 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार नाही. या स्पर्धेत पाकिस्तान संघ आपले साखळी सामने कोलंबोमध्ये खेळणार आहे. मात्र, स्पर्धेचे बाद फेरीचे सामने कुठे होणार याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे उपांत्य आणि अंतिम सामने दुबईमध्येच खेळवले जातील. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तथापि, असेही सांगण्यात आले की जर टीम इंडिया स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचली नाही, तर अशा परिस्थितीत उपांत्य आणि अंतिम सामने लाहोर आणि रावळपिंडीमध्ये होतील. चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आता वेळापत्रक आल्यानंतरच कोणते सामने कुठे होणार हे कळेल.
हेही वाचा-
पाकिस्तानची पराभवांची मालिका सुरूच, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका बनला तिसरा संघ
बाबर आझमने मोडला ख्रिस गेलचा मोठा विक्रम , विराट-सूर्या जवळपासही नाही
मैदानात उतरताच विराट कोहलीने पूर्ण केले ‘शतक’, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय