---Advertisement---

‘..तर आम्ही फिफा विश्वचषकही जिंकू’, सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा हास्यास्पद दावा

---Advertisement---

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. अर्शद नदीमने भालाभेक स्पर्धेत सुवर्ण पदक आपल्या नावे केला होता. यासह तो पाकिस्तानसाठी वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताच पाकिस्तानचा दृष्टिकोन बदलला. आता फिफा विश्वचषकाबाबत देशाकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

210 देशांच्या यादीत पाकिस्तानचे फिफा रँकिंग 197 आहे. हेही न पाहता पाकिस्तानचे नॅशनल असेंब्ली सदस्य बिलावल भुट्टो म्हणाला की, आम्हाला थोडी मदत मिळाली तर पाकिस्तान फिफा वर्ल्ड कपही जिंकू शकतो.

शुक्रवारी विधानसभेत बोलताना संसद सदस्य बिलावल भुट्टो म्हणाला, “फक्त ऑलिम्पिक किंवा क्रिकेटमध्येच नाही, जर त्यांना थोडा पाठिंबा दिला तर आपण फिफा विश्वचषकही जिंकू शकतो. मला अर्शद नदीमच्या विजयाबद्दल अभिनंदन करायचे आहे. आम्ही सर्वजण त्याच्या विजयाचे कौतुक करतो. त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.

बिलावल भुट्टो पुढे बोलताना म्हणाला, कराची येथील ल्यारी मधील प्रत्येक दुसरा मुलगा फीफा वर्ल्ड कप जिंकू शकतो. मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी पेशावरला गेलो होतो. तिथल्या काही मुलींनी तायक्वांदोमध्ये पदके जिंकली. पुढच्या स्पर्धेत पाकिस्तानने सहभागी व्हावे, हे आमचे ध्येय असले पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये सर्व क्षेत्रांतून पदक विजेते असावेत, मी पाकिस्तानच्या क्रीडामंत्र्यांना विनंती करेन की, त्यामुळे आम्ही सर्व क्षेत्रांतून अर्शद नदीमला पाठिंबा देऊ शकतो.

हेही वाचा-

पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू
‘ट्रान्सजेंडर’ इमान खलीफनं जिंकलं सुवर्णपदक; महिला असण्याबद्दल झाले होते प्रश्न उपस्थित
Paris Olympics: भारतासाठी आज 7 वे पदक निश्चित होणार? जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---