ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये अगोदर कसोटी मालिका खेळली गेली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ०-१ ने पराभूत करत मालिका आपल्या नावे केली. त्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली, जी पाकिस्तानने २-१ ने नावे केली. ही मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तान संघाने काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे संघाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या या विजयानंतर पाकिस्तान संघ ट्राॅफीसोबत आनंद साजरा करताना दिसला. सर्व खेळाडू विजय मिळाल्यामुळे एवढे खुश झाले होते की निम्मे खेळाडू विनर बोर्डसहित खाली पडले. यामध्ये कोणत्याही खेळाडूला दूखापत झाली नाही. काही खेळाडू खाली पडल्यानंतर पटकन उठून उभे राहिले. यानंतर या खेळाडूंना ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागत आहे.
— Hassam (@Nasha_e_cricket) April 2, 2022
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि बाबर आझमच्या पाकिस्तान संघाला ट्रोल केले जात आहे. काही चाहत्यांनी म्हटले आहे की, स्वस्त कामे करशील तर असेच होणार. तर काही खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची मज्जा घेतली आहे.
या संपूर्ण मालिकेत बाबर आझमने शानदार फलंदाजी केल्यामुळे त्याला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषीत केले गेले. त्याने तीन सामन्यांत मिळून २७६ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांचा आणि अर्धशतकांचा सुद्धा समावेश आहे. यादरम्यान त्याने अनेक विक्रम केले आहेत.
या एकदिवसीय मालिकेत इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझमने महत्त्वपूर्ण खेळी खेळली. तिसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत २१० धावांचे लक्ष्या ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. पाकिस्तानने हे लक्ष्य ३७.५ षटकात १ विकेट गमावत गाठले. यावेळी बाबर आझमने १०५ धावा करत संघाच्या विजयात मह्त्त्वाची भुमिका निभावली. पाकिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलने परदेशी खेळाडूला शिकवला ‘बल्ब उतारो डान्स’, Video पाहून व्हाल लोटपोट