आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलीम जाफर अध्यक्ष असलेल्या निवडसमितीने 15 खेळाडूंची निवड केली आहे. संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अष्टपैलू निदा दार हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. बिस्माह मारूफने कर्णधारपद सोडल्यानंतर तिच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यादरम्यान पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात 6 सामने खेळले जातील.
या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, जे काही दिवसांनंतर जाहीर केले जाईल. पाकिस्तान संघाचे 14 ऑक्टोबरपासून लाहोरमधील डीएचए गनी इन्स्टिट्यूट फॉर क्रिकेटमध्ये सहा दिवसांचे शिबीर होईल आणि 20 ऑक्टोबर रोजी लाहोरहून दुबईमार्गे बांगलादेशला पोहोचेल.
पाकिस्तानची 31 वर्षीय अनुभवी फलंदाज इरम जावेदचे तब्बल वर्षभरानंतर संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत तिने शेवटचा सामना खेळला होता. याव्यतिरिक्त पीएसएल 2023 स्पर्धेमध्ये महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या तीन टी20 सामन्यांमध्ये ती सुपर वुमन संघाचा देखील भाग होती.
मागील महिन्यात दक्षिण अफ्रीकेविरुद्ध कराची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेत खेळणाऱ्या शावाल जुल्फिकार आणि सैदा अरूब शाह यांना संघात सामील करण्यात आलेले नाही. (Pakistan women squad announced for Bangladesh tour experienced batsman return after a year)
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ-
निदा दार (कर्णधार), आलिया रियाज, बिस्माह मारूफ, डायना बेग, गुलाम फातिमा, इरम जावेद, मुनीबा अली (यष्टीरक्षक), नजीहा अल्वी (यष्टीरक्षक), नशरा संधू, नतालिया परवेज, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिदरा अमीन, उम्म-ए-हानी आणि वहीदा अख्तर
राखीव खेळाडू– अंबर कायनात, ओमैमा सोहेल, सिदरा नवाज (यष्टीरक्षक)
हेही वाचा-
‘शुबमन बाहेर पडला तर भारताला फरक पडला नाही अन् नसीममुळे आम्हाला…’, शोएब मलिकचे मोठे विधान
ऑस्ट्रेलिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला कशी रोखणार? बावुमाची सेना करणार बॅटिंग; सामन्यात महत्त्वाचे 3 बदल