---Advertisement---

आफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे विंडीजचा थरथराट, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १०९ धावांनी विजय; मालिका बरोबरीत

---Advertisement---

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने चमकदार कामगिरी करत वेस्टइंडिजला 109 धावांनी नमवत सामना जिंकला. पाकिस्तानच्या विजयाचा नायक वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने अमूल्य योगदान दिले. त्याने पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात चार बळी घेतले. यासह दोन कसोटींची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना एका विकेटने जिंकला होता.

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना जमैकाच्या सबिना पार्क येथे झाला. सामन्यात पाकिस्तान आपल्या गोलंदाजांच्या बळावर मजबूत स्थितीत पोहचला होता. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्टइंडिजने 49 धावांवर एक गडी गमावला होता. पाचव्या दिवशी पुढे खेळताना वेस्टइंडिजने लवकरच आपले चार गडी गमावले. केली मेयर्स आणि जेसन होल्डर यांनी सातव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करत काही काळ संघर्ष केला. पण आफ्रिदीने त्याला चालते केले. होल्डरने 47 धावा केल्या, त्यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार निघाले. याआधी फवाद आलमने या सामन्यात पाचवे कसोटी शतक झळकावले होते.

पहिल्या डावात शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना पाकिस्तानकडून 6 बळी घेतले. आफ्रिदीच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 152 धावांची आघाडी घेतली होती. त्याचवेळी, पाकिस्तान संघाने आपल्या दुसऱ्या डावात टी20 सारखी जोरदार फलंदाजी करत 27.3 षटकांत 176 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

पाकिस्तानच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने फवाद आलमने शानदार फलंदाजी करताना शतक ठोकले होते. तो 124 धावांवर नाबाद राहिला होता. त्याच्याशिवाय मोहम्मद रिझवानने 31 आणि फहीम अशरफने 26 धावा केल्या होत्या. खालच्या क्रमात शाहीन शाह आफ्रिदने 19 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पाकिस्तानने पहिल्या डावात 9 बाद 302 धावा करून डाव घोषित केला होता. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जेडेन सील यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले होते.

या विजयासह पाकिस्तानने मालिका 1-1 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे. पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा यासह संपला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अजबच! धोनीने मारले लांबच लांब शॉट्स आणि मग स्वत:च संघसहकाऱ्यांसह गेला झुडपात चेंडू शोधायला

विराटसेना हेडिंग्लेवर करणार ‘पदार्पण’, आजपर्यंत अशी राहिलीये या मैदानावरील भारत-इंग्लंडची कामगिरी

“कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो, तो अजित यांच्यासारखा वाटतो”, वाडेकरांच्या पत्नीकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---