भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने सध्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. त्यामुळे त्याचे चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता त्या चाहत्यांच्या यादीत पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अलीचे नावही जोडले गेले आहे.
हैदर (Haider Ali) म्हणतो, त्यालाही रोहित (Rohit Sharma) सारखा फलंदाज बनायचे आहे. रोहित प्रमाणेच त्यालाही आपल्या देशासाठी पुन्हा- पुन्हा द्विशतकी खेळी करायची आहे. यावर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकात जोरदार कामगिरी करणाऱ्या हैदरची इंग्लंड दौर्यासाठी पाकिस्तान संघात निवड झाली आहे.
तो ऑनलाइन मीडिया संवादमध्ये बोलताना म्हणाला, “जर आदर्शाचा प्रश्न असेल, तर रोहित शर्मा माझा रोल मॉडेल आहे. मला तो एक खेळाडू म्हणून खूप आवडतो. त्याच्यासारखी मलाही माझ्या संघाला सलामीला एक अत्यंत आक्रमक सुरुवात करून द्यायची आहे. त्याच्याप्रमाणे मलाही सफाईने मोठे शॉट्स मारायचे आहेत. तो तिन्ही प्रकारात जबरदस्त खेळतो.”
“सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जेव्हा तो ५० धावा पार केल्यानंतर १०० करतो आणि मग १५० किंवा २०० चा विचार करतो. मीही त्याच्यासारख्या मोठ्या खेळी खेळू इच्छित आहे. तो खरोखर मॅच विनर खेळाडू आहे,” असे रोहितबद्दल बोलताना हैदर पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ताशी १५४.४ किमी वेगाने गोलंदाजी करणारा ‘तो’ भारतीय गोलंदाज म्हणून झाला लवकर निवृत्त
-सराव शिबीरात धोनी दिसणार का? पहा हे ५ तज्ञ खेळाडू काय म्हणताय
-क्रिकेटलाही कोरोनाची झळ! या माजी कर्णधारालाही झाली कोरोनाची लागण