सर्व क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात ३० ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर होणार आहे. पहिल्यांदाच हा आशिया चषक हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केला जात आहे. यात पीसीबी चे आयोजन अधिकार आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळले जातील. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. माध्यमातील वृत्तांनुसार पीसीबीने बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे आमंत्रण पाठवले आहे. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली याने यावरून पीसीबीवर टीका केली आहे.
बसित अली (Basit Ali) त्याच्या युट्यूब चॅनेलनर बोलताना म्हणाला की, पीसीबीने जय शाह (Jay Shah) यांच्यासह सर्व मंडळांच्या प्रमुखांना आमंत्रणे पाठवली आहेत. यापूर्वीही जय शहा यांना निमंत्रण पाठवून त्यांनी येण्यास सांगितले. मात्र, त्यांच्यावर दबाव आल्यावर त्यांनी येण्यास नकार दिला. एसीसीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी कोणत्याही स्पर्धेत जायला हवे. जर त्यांना आमंत्रित केले असेल, मग ते पाकिस्तान, बांगलादेश किंवा नेपाळमधील असो. मला वाटते की जय शहा आले नाही तर त्यांचे नुकसान होऊ शकते.
पाकिस्तानचा माजी खेळाडू पुढे म्हणाला की पीसीबी अध्यक्षांनी माजी खेळाडूंना निमंत्रण पाठवायला हवे होते. श्रीलंकेकडून रणतुंगा, संगकारा, जयसूर्या भारताकडून कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली. तसेच बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळमधून. या सर्वांना तुम्ही सामन्यापूर्वी वाहनांतून मैदानाभोवती घेऊन जाल, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही खूश होतील. जय शहा सारखा चेअरमन पाहून कोण टाळ्या वाजवणार.
2 सप्टेंबरला रंगणार भारत पाकिस्तानचा महासामना
आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ ‘अ’ गटात आहेत आणि या दोन्ही संघांमधील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. यानंतर भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी याच मैदानावर नेपाळ संघाविरुद्ध गटातील दुसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 सामने 6 सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान 10 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येणार आहेत. (pakistani cricket player basit ali slams pcb for inviting bcci secretary jay shah for asia cup opning match)
महत्वाच्या बातम्या-
देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामातील पहिल्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, MPL गाजवणारा पठ्ठ्या कर्णधार
NCA मधून आली टीम इंडियासाठी गुड न्यूज! श्रेयसची निवड फिक्सच, वाचा सविस्तर