पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने संघातील खेळाडूंबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचे पीसीबीकडून सांगण्यात आले आहे. या नव्या करारामध्ये पाकिस्तानी खेळाडूंसाठी ऐतिहासिक वाढ पाहायला मिळणार आहे. झका अश्रफ हे पीसीबीचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
झका अश्रफ (Zaka Ashraf) म्हणतात की, “पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंच्या खेळामुळे आणि प्रयत्नांमुळे पीसीबी चालते. खेळाडूंच्या कलागुणांना आणि क्रिकेटसाठी असलेले त्यांचे प्रेम यांना ओळखून त्यांना वाव देणे हा पीसीबीचा हेतू आहे.” पाकिस्तानच्या एका क्रिकेट रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज बाबर आझम (Babar Azam), यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यासह अनेक खेळाडूंच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्व प्रकारच्या खेळाडूंना मासिक वेतन म्हणून 4.5 दशलक्ष PKR (सुमारे 13.22 लाख भारतीय रुपये) देण्याचे ठरविले आहे. दुसरीकडे, पीसीबी आणि पाकिस्तानी खेळाडू यांच्यातील मागील करारानुसार कसोटी खेळाडूंना 1.1 दशलक्ष PKR (सुमारे 3.2 लाख भारतीय रुपये) आणि मर्यादित षटकांच्या खेळाडूंना 0.95 दशलक्ष PKR (सुमारे 2.8 लाख भारतीय रुपये) मिळायचे.
पाकिस्तानी रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले की, मानधन वाढीबरोबर अन्य देशांतील टी20 स्पर्धेमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावरही पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. आता संघातील ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी असेल, तर ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना 2 फ्रँचायझी स्पर्धेत खेळता येणार आहे आणि ‘सी’ वर्गातील खेळाडूंना 3 फ्रँचायझी स्पर्धेत भाग घेता येणार असल्याचे, या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक हा पीसीबीचा तांत्रिक समितीचा अध्यक्ष आहे. या प्रकरणी पाकिस्तानी खेळाडू मिस्बाह उलच्या संपर्कात असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. तसेच, 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात वनडे मालिका खेळणार आहे. (pakistani cricket players salary to increase pcb decided)
महत्वाच्या बातम्या-
‘या’ स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार पाकिस्तानचे निवृत्त खेळाडू, अनेक दिग्गजांचा असणार समावेश
भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या ईशांतला ‘या’ धुरंधराने दिला सर्वात जास्त त्रास, स्वत:च सांगितले नाव