दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चालू असलेली वनडे मालिका अतिशय रोमांचक होत चालली आहे. बुधवार रोजी (०७ एप्रिल) या मालिकेतील तिसरा वनडे सामना पाकिस्तानने २८ धावांनी जिंकला. हा सामना जिंकत त्यांनी वनडे मालिकाही २-१ ने खिशात घातली आहे. या सामन्याला खरी रंगत चढली पाकिस्तानच्या पहिल्या डावातील अंतिम षटकात.
डावाच्या शेवटी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने एकाच षटकात ४ खणखणीत षटकार मारले. त्याच्या या धडाकेबाज खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तर झाले असे की, नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिका संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडली. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी उतरले. ४६ व्या षटकापर्यंत पाकिस्तानचा डाव ६ बाद २५७ धावा अशा स्थितीत होता. त्यानंतर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत हसन अलीने आक्रमक पवित्रा घेतला.
अलीने ११ चेंडूत नाबाद ३२ धावा चोपल्या. दरम्यान दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज जेजे स्मट्स हा डावातील ४९ वे षटक टाकण्यासाठी आला असता. त्याच्या षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने सलग ३ षटकार मारले. तत्पुर्वी दुसऱ्या चेंडूवरही एक उत्तुंग षटकार ठोकला होता. अशाप्रकारे एकाच षटकात अलीने ४ गगनचुंबी षटकार लगावले.
https://twitter.com/taimoorze/status/1379759702129664000?s=20
त्याच्या या छोटेखानी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकाला ३२० धावांचे भलेमोठे आव्हान दिले. यात सलामीवीर फखर जमान याच्या शतकी खेळीचाही समावेश होता. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघ ४९.३ षटकात २९२ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सर्वकाही बदललं, माझ्या आईने चिकन विकण्याचं कामही बंद केलं आहे”
धोनीने ‘तो’ सल्ला दिला अन् माझं नशीब बदललं; टी नटराजनने सांगतली ‘राज की बात’






