देशात अलीकडेच घडलेली सर्वात दु:खद घटना म्हणजे ओडिसा राज्याच्या बालासोर येथील रेल्वे अपघात. अनेक भारतीय खेळाडूंनी यादरम्यान मदतीचा हातही दिला आहे. या अपघातावर जगभरातील लोक दु:ख व्यक्त करत आहेत. अशात पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यानेही दु:ख व्यक्त केले आहे. शुक्रवारी (दि. 02 जून) झालेल्या या अपघातात जवळपास 275 लोक मरण पावले आहेत, तर 1 हजारहून अधिक व्यक्ती जखमी झाले आहेत.
मोहम्मद रिझवानने दु:ख केले व्यक्त
मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने ट्वीट करत दुर्घटनेत सापडलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मानव जीवनाचे नुकसान नेहमीच वेदनादायक असते. माझे हृदय आणि प्रार्थना भारतात रेल्वे दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या लोकांसोबत आहे.”
Loss of human lives is always painful as we are all one ummah. My heart and prayers goes to the people affected by the train accident in India. ???? pic.twitter.com/8Rsq2TSEoD
— Muhammad Rizwan (@iMRizwanPak) June 4, 2023
सध्या हार्वर्डमध्ये शिकतायेत बाबर-रिझवान
रिझवान सध्या बाबर आझम याच्यासोबत हार्वर्ड विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम म्हणजेच कार्यकारी शिक्षण कार्यक्रमात शिकत आहेत. नुकतेच त्यांच्या वर्गातील अनेक फोटोही समोर आले होते. बाबर आणि रिझवान या प्रतिष्ठित कार्यक्रमात भाग घेणारे पहिले क्रिकेटपटू बनले आहेत. हा कार्यक्रम विशेषत: मनोरंजन, मीडिया आणि क्रीडा व्यवसायावर (बीईएमएस) केंद्रित आहे.
ओडिसा दुर्घटनेचा सीबीआय तपास
दुसरीकडे, ओडिसा दुर्घटनेबद्दल बोलायचं झालं, तर सध्या दुर्घटनेत बाधित झालेले दोन्ही ट्रॅकवरून रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने 51 तासांच्या आत ट्रॅक सामान्य स्थितीत आणले आहेत. तसेच, या प्रकरणाचा सीबीआय तपास केला जाईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
चहल आणि सेहवागची मदत
विशेष म्हणजे, या रेल्वे अपघातात आई-वडील, पालकांना गमावणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भारतीय दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने उचलण्याची घोषणा केली आहे. तसेच, फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यानेही 1 लाख रुपयांची मदत केली आहे. (pakistani cricketer mohammad rizwan expresses grief over odisha train accident)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटपटूंचे सोशलमीडिया हँडल हॅक होण्याचे सत्र सुरूच, आता ‘या’ अष्टपैलूवर आले संकट
WTC फायनलमध्ये पावसाने खोडा घातला तर कुणाला मिळणार ट्रॉफी? लगेच वाचा काय सांगतो नियम