तो दिवस २७ ऑगस्ट १९७४ चा. पाकिस्तानच्या लाहोरमधील झोपडपट्टीत एका मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव होते यूसुफ योहाना. एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन मोहम्मद यूसुफ बनला.
मोहम्मद यूसुफने फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर संपूर्ण क्रिकेटजगतात त्याचे नावलौकिक केले आहे. यूसुफची आकडेवारी त्याची महानता दर्शवते. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९० सामन्यात ५२.२९च्या सरासरीने ७५३० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २४ शतकांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, यूसुफने वनडे कारकिर्दीत २८८ सामन्यात ४७.७१च्या सरासरीने ९७२० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १५ शतकांचा समावेश आहे. यावरून स्पष्ट होते की, यूसुफ हा पाकिस्तानच्या महान फलंदाजांपैकी एक आहे.
रोमांचक गोष्ट ही आहे की, लाहोरच्या एका झोपडपट्टीत जन्मलेला हा मुलगा, ज्याला त्याच्या कुंटुंबाचे पोट भरण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. मग, तो इतका मोठा क्रिकेटपटू कसा बनला?अखेर कसा यूसुफने झोपडपट्टीपासून महालापर्यंतचा प्रवास गाठला? तर, जाणून घेऊया त्या एका घटनेविषयी जिने यूसुफच्या जिवानाचा कायापलट करून टाकला. Pakistani Cricketer Mohammad Yousuf’s journey from auto driver to worlds best cricketer.
यूसुफ हा खूप गरीब कुटुंबात जन्मला होता. त्यांच्याकडे राहण्यासाठी चांगले घरही नव्हते. त्याचे वडील रेल्वे स्टेशनवर सफाई कामगार म्हणून काम करत होते. त्यांच्या पैशावरही घरातील खर्च भाग नव्हता, म्हणून यूसुफने खूप कमी वयात टेलरच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर, त्याने एकावेळेला रिक्षाही चालवली होती. पण, इतर मुलांप्रमाणेही यूसुफला क्रिकेट खेळायची खूप आवड होती.
यूसुफ १२ वर्षांचा होता. त्यावेळी बॅट विकत घेण्याइतकेही पैसे त्याच्याकडे नव्हते. म्हणून यूसुफने लाकडाच्या फळीपासून बॅट बनवली होती आणि तो टेनिस बॉलने क्रिकेट खेळत असायचा. त्याची फलंदाजी शैली इतकी शानदार होती की गोलंदाजही त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडायचे. जेव्हा यूसुफ १६ वर्षांचा होता, तेव्हा लाहोरच्या गोल्डन जिमखाना क्लबने त्याच्यातील कौशल्याला हेरले.
झाले असे की, यूसुफ टेलरच्या दुकानावर काम करत होता. त्यावेळी एका स्थानिक क्लबचे काही खेळाडू त्याच्या शोधात दुकानात शिरले. कारण त्यांच्या ११ जणांच्या संघात एका खेळाडूची गरज होती. पण, यूसुफने त्यांना नकार दिला. तरीही ते खेळाडू त्याला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. गमतीची गोष्ट ही की, यूसुफने त्या सामन्यात शतक ठोकले होते. तो ब्रॅडफॉर्ड क्रिकेट लीगचा सामना होता. यूसुफने त्या संपूर्ण लीगमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या.
इथूनच यूसुफचे जिवन बदलले. पुढे त्याने क्रिकेटला गंभीरतेने घ्यायला सुरुवात केली आणि १९९८ला त्याच्या जिवनात अशी संधी चालून आली, ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. २६ फेब्रुवारी १९९८ला त्याची येथील दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात निवड झाली होती. यावेळी त्याने २ डाव खेळत कशा-बशा ६ धावा केल्या होत्या.
त्यानंतर त्याची बुलवायो येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही निवड झाली होती. यावेळी त्याने २ डावात अर्धशतक ठोकत आपले फलंदाजी कौशल्य दाखवून दिले. शिवाय, त्याने १९९९८ला झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीतच आपले पहिले कसोटी शतक जडले होते. हा कारनामा त्याने लाहोरमधील मैदानावर नाबाद १२० धावांची खेळी करत केला होता.
आपल्या पहिल्या कसोटी शतकावरच यूसुफ थांबला नाही. त्याने २००२-०३ला झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत नाबाद ४०५ धावा करत विश्वविक्रम नोंदवला. अखेर २००६ला त्याने स्वत:ला एक महान फलंदाज म्हणून सिद्ध करून दाखवले.
त्याने २००६ला संपूर्ण वर्षात ११ कसोटी सामने खेळत ९ शतके आणि ३ अर्धशतके ठोकले होते. यावेळी त्याने संपूर्ण वर्षात ९९पेक्षाही जास्त सरासरीने १७८८ धावा केल्या होत्या. हा एक विश्वविक्रम आहे. यासह त्याने विवियन रिचर्ड्स यांचा ३० वर्ष जुना विक्रमही मोडला होता. त्यांनी एका वर्षांत कसोटीत १७८० धावा करत हा विक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीनं भारताला मिळवून दिलं कांस्यपदक
आशिया चषकातील महामुकाबल्यापूर्वी ‘किंग कोहली’ने दिला आठवणींना उजाळा! सांगितले पाकिस्तानविरुद्धचे किस्से
पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने दाखवला आपला दबदबा! अवघ्या 105 धावात गुंडाळला श्रीलंकेचा डाव