न्यूझीलंड क्रिकेट संघ 2 कसोटी आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (दि. 06 जानेवारी) संपला. हा सामना अनिर्णित ठरला. विशेष म्हणजे, पहिला कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता. असे असले, तरीही पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याने ही मालिका गाजवली. त्याला या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील कामगिरीसाठी सामनावीर आणि एकूण मालिकेत चमकल्याबद्दल मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त त्याने आणखी एक खास कारनामा केला.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याने शानदार शतक साकारले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याची चौथे शतक आहे. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावरील हे त्याचे पहिलेच कसोटी शतक आहे. सरफराजने हे शतक पाकिस्तान संघ अडचणीत असताना झळकावले होते.
HE'S DONE IT! 💯
A fourth-innings masterclass from @SarfarazA_54 as he brings up his 4️⃣th Test century 💪#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/Vmbh9Ti7zR
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 6, 2023
सरफराजने 9 वर्षांनंतर केले शतक
पाकिस्तान संघाने सामन्याच्या शेवटच्या दिवशी 319 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेवणाच्या ब्रेकपूर्वी पाच विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर सरफराजने सौद शकील याच्यासोबत शतकी भागीदारी रचत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. तसेच, त्याने शतकही झळकावले. सरफराजने आगा सलमानसोबतही अर्धशतकी भागीदारी रचली. सरफराजने हे शतक तब्बल 9 वर्षांनंतर ठोकले. या मालिकेपूर्वीच्या सामन्यातही सरफराजने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सरफराजने 176 चेंडूंचा सामना करताना 118 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 9 चौकारांचाही पाऊस पाडला. यासह त्याने त्याच्या सर्वाधिक 112 धावांचा आकडाही पार केला.
सरफराज अहमद याने यापूर्वी 2014मध्ये कसोटी शतक झळकावले होते. त्याने सन 2014मध्येच तीन शतक ठोकले होते. सरफराज अहमद हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानचा यष्टीरक्षक आहे. सरफराजने पाकिस्ताकडून 51 कसोटी सामन्यातील 90 डावात फलंदाजी करताना 38.85च्या सरासरीने 2992 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 शतके आणि 21 अर्धशतकेही झळकावली आहेत. (pakistani cricketer sarfaraz ahmed hits fourth century in test cricket after nine years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात दुसऱ्यांदा चमकला शनाका, आधी धोनी आणि आता कर्णधार हार्दिकला दिला धक्का
‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य