Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य

'नो- बॉल हा गुन्हाच...', टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य

January 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya

Photo Courtesy: Twitter/BCCI


पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे गुरुवारी (दि. 05 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंका संघाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात श्रीलंकेने भारताला 16 धावांनी पराभूत केले. तसेच, मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या हा रागाने लाल झाला. त्याने सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली.

या खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर
झाले असे की, या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत 6 विकेट्स गमावत 206 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 190 धावाच करता आल्या. अशाप्रकारे श्रीलंका संघाने हा सामना 16 धावांनी आपल्या खिशात घातला. सामन्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भलताच रागात दिसला. त्याने या पराभवाचे खापर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर फोडले.

The match went down to the wire but it is Sri Lanka who won the second T20I by 16 runs.

Scorecard ▶️ https://t.co/Fs33WcZ9ag #TeamIndia | #INDvSL pic.twitter.com/YoE4hvgZoA

— BCCI (@BCCI) January 5, 2023

हार्दिक पंड्या काय म्हणाला?
पंड्या म्हणाला की, “आम्ही काही छोट्या छोट्या चुका केल्या, ज्या आम्ही करायला नको होत्या. तुमचा दिवस चांगला असू शकतो, खराबही असू शकतो. मात्र, तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याने यापूर्वीही नो- बॉल टाकण्याची चूक केली आहे. मला कोणावरही आरोप लावायचा नाहीये, परंतु नो- बॉल (No- Ball) टाकणे हा गुन्हा आहे.”

विशेष म्हणजे, भारतीय संघाच्या पराभवाचे कारण हे नो- बॉल टाकणे होते. या सामन्यात भारतीय संघाने एक-दोन नाही, तर तब्बल 7 नो- बॉल फेकले. यामध्ये अर्शदीप सिंग याने एकट्याने 5, तर उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 नो- बॉल टाकला.

हार्दिक पंड्याने गायले या खेळाडूंचे गुणगान
“सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी शानदार फलंदाजी केली. त्यांच्यात जी भागीदारी होत होती, त्यामुळे आम्ही सामन्यात कायम होतो. मात्र, हा सामना आमच्या नशिबात नव्हता,” असे पुढे बोलताना पंड्या म्हणाला.

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील तिसरा टी20 सामना शनिवारी (दि. 07 जानेवारी) खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करतील. (ind vs sl 2nd t20 match captain hardik pandya lose match statement angry on this player)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित आणि विराटची टी-20 कारकीर्द समाप्त? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळाले संकेत
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण


Next Post
Hardik Pandya

INDvSL: सामना संपण्याआधीच हार्दिकने मानली होती हार, आता होतोय ट्रोल

Team-India-And-Dindesh-Karthik

'जरा इंग्लंडकडं बघा...', भारताच्या टी20 क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीवर भडकला दिनेश कार्तिक

Dasun Shanaka

पुण्यात दुसऱ्यांदा चमकला शनाका, आधी धोनी आणि आता कर्णधार हार्दिकला दिला धक्का

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143