जगभरातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान क्रिकेटपटू शादाब खान याची गणना होते. शादाब शानदार फिरकीपटू, आक्रमक फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक आहे. तो त्याच्या मजेशीर अंदाजासाठीदेखील ओळखला जातो. इतर खेळाडूंप्रमाणे शादाबवरही जगभरातून प्रेमाचा वर्षाव होतो. यामागील कारण म्हणजे, तो मैदानावर असताना आपले 100 टक्के योगदान देतो. 24 वर्षांचा शादाब मुलींमध्येही भलताच लोकप्रिय आहे. या कारणामुळे तो अनेकदा वादांमध्ये अडकला आहे.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाने न्यूझीलंडमध्ये तिरंगी मालिका खेळली. यामधील तिसरा संघ बांगलादेश होता. ही तिरंगी मालिका पाकिस्तान संघाने आपल्या नावावर केली. सामन्यानंतर पाकिस्तानी संघाने चाहत्यांची भेट घेतली. त्यांनी चाहत्यांना आपले किटही भेट म्हणून दिले. यादरम्यान एका महिला चाहतीने शादाब खान (Shadab Khan) याला प्रपोज केले. न्यूझीलंड संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या महिला चाहतीच्या मते, शादाबवर तिचे प्रेम आहे, तिने त्याला प्रपोजही केले होते. मात्र, शादाब लाजला आणि त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.
शादाबवरील गंभीर आरोप
दुबईच्या अशरीना साफिया हिने शादाब खान याच्यावर 2020मध्ये अनेक गंभीर आरोप लावले होते. साफियाने म्हटले होते की, शादाब तिला खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लीक करण्याच्या धमक्या देत होता. साफियानुसार, शादाब हा एक फसवणूक करणारा व्यक्ती आहे. त्याचा उद्देश फक्त मुलींना फसवून त्यांचा शारीरिक फायदा घेणे असतो. त्यानंतर तो कोणत्यातरी कारणाने ब्रेकअप करतो. या महिलेने दावा करत सोशल मीडियावर लिहिले होते की, 2019 मध्ये तिची शादाबसोबत भेट झाली होती. मार्च 2019 मध्ये दोघेही जवळचे मित्र बनले होते. त्यांच्यामध्ये 2019विश्वचषकादरम्यान चांगले नाते निर्माण झाले होते. साफियाने असाही दावा केला की, शादाबसोबत तिने अनेक देशांचे दौरेही केले आहेत.
https://twitter.com/babarazam100/status/1580926291695796225?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1580926291695796225%7Ctwgr%5E01dbe212395d1200a7b54a699c49f328a0a479cd%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Ft20worldcup%2Fnews%2Fpakistani-cricketer-shadab-khan-got-proposal-by-female-fan%2Farticleshow%2F94878230.cms
लग्नाच्या जाहिरातीवरून वाद
पाकिस्तान संघाचा उपकर्णधार शादाब खान याच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये त्याच्या लग्नासाठी एका मुलीचा शोध सुरू होता. शादाबचा मित्र फलक राजाने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत शाबादचे फोटो शेअर केले होते. तसेच, त्याने लिहिले होते की, “नातं जोडायचंय! मुलीचे वय 16 ते 20मध्ये असले पाहिजे. उंची कमीत कमी 5 फूट 3 इंच. मुलगी डॉक्टर असेल, तर महत्त्व दिले जाईल. मुलगी चांगल्या कुटुंबातील असायला पाहिजे. ती खूपच सुंदर असली पाहिजे. मेसेजवर माझ्याशी संपर्क साधा. मी तुमची माहिती शादाब आणि त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवेल.”
शादाबबद्दल बोलायचं झालं, तर त्याने शेवटचा टी20 सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. यावेळी गोलंदाजी करताना त्याने 30 धावा देत 1 विकेट घेतली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट अन् बाबरपेक्षा इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज भारी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे हैराण करणारं वक्तव्य
शॉकिंग! शमीच्या एक्स पत्नीसोबत चालत्या रेल्वेमध्ये घडली मोठी घटना, तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने…