जगातील असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या चाहत्यांसाठी नवीन काही तरी पोस्ट करत असतात. अशामधेच पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शोएब अख्तरचा मुलगा मोहम्मद मिकाइल अली टीव्हीवरील लागलेले बॉलिवूड चित्रपटातील गाणे बघून डान्स करता दिसून येत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना शोएब अख्तरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अमीर खानचे काम आज देखील मी आणि प्रत्येक मुलासाठी चमत्कार करत आहे.’ शोएब अखतरच्या मुलाला बॉलिवूड अभिनेता आमिर खान खूप आवडतो.
अख्तरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की त्याचा मुलगा आमीर खानचा सुपरहिट चित्रपट ‘तारे जमीन पर’ यातील ‘बम बम बोले’ गाण्यावर मोहम्मद डान्स करत आहे. व्हिडिओ पाहून अनेक चाहते कमेंट करत आहेत.
https://www.instagram.com/p/CQqFowIHgaS/
पाकिस्तानचा खेळाडू शोएब अखतर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. शोएब अख्तरचे लग्न 2014 मध्ये झाले आणि 2016मध्ये त्याला मुलगा झाला. शोएब अख्तर क्रिकेटपासून जरी लांब असला तरीही, तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्यासोबत संवाद साधत असतो. शोएब अख्तर जागतिक क्रिकेटबद्दल आपले मत अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त करत असतो.
विशेष म्हणजे शोएब अख्तर पाकिस्तानी क्रिकेट स्वरूपाबद्दल नेहमी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करताना दिसतो. इतकेच नव्हे तर पाकिस्तान क्रिकेटबद्दल चांगल्या गोष्टींबरोबरच तो वाईट गोष्टी देखील तो चाहत्यांना सांगत असतो. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकांवर खूप रागावला होता. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमिरच्या मुद्द्यावर देखील शोएब अख्तरने आपले मत सोशल मीडियावर शेअर केले होते.
शोएब अख्तरने कसोटीमध्ये 178 विकेट घेतल्या. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 247 विकेट आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 19 विकेट घेण्यात त्याला यश मिळाले आहे. शोएब अख्तरला क्रिकेटमध्ये ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने ओळखले जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक भारतातून युएईमध्ये का हलवण्यात आला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा
WTC फायनलनंतर कडाडून टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय संघाच्या मदतीला धावला विलियम्सन, म्हणाला…
चूकिला माफी नाही! गोव्यातील गावात कचरा फेकण्याबद्दल अजय जडेजावर सरपंचांकडून कारवाईचा बडगा





